शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

सायबर गुन्ह्यांवर ‘व्हॉट्सअप’चा हंटर, चार महिन्यांत देशातील २.९४ कोटी खाती बंद

By योगेश पांडे | Published: June 21, 2024 11:54 PM

ट्रेडिंगच्या जाळ्यासह व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन फ्रॉड वाढीस : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कारवाईत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरात मागील काही काळापासून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढत असून अनेक गुन्हेगारांकडून व्हॉट्सअपच्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येत आहे. यासंदर्भात युझर्स, सरकारी यंत्रणेकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने व्हॉट्सअपकडून कारवाईचा हंटर उगारण्यात येत आहे. २०२४ च्या पहिल्या चार महिन्यांत गैरप्रकारात सहभागी असलेली व्हॉट्सअपची २.९४ कोटी खाती बंद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कारवाईचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे.

व्हॉट्सअपच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणावर फ्रॉड करण्यात येत आहे. विशेषत: शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली व्हॉट्सअप ग्रुपला जोडून गंडविण्याचे प्रकार वाढले आहेत. ‘लोकमत’ने या संपूर्ण प्रकारावर सविस्तर प्रकाश टाकला होता. याशिवाय व्हॉट्सअपच्या माध्यमातून महिलांची छळवणूक, फेक न्यूज इत्यादी गैरप्रकारदेखील करण्यात येतात. याबाबत युझर्ज किंवा सरकारी यंत्रणेच्या तक्रारींची व्हॉट्सअपकडून दखल घेण्यात येते. व्हॉट्सअपने २०२१ सालापासून अशी खाती बंद करणे सुरू केले होते. मात्र आता कारवाईचा वेग वाढला आहे. २०२४ मध्ये पहिल्या चार महिन्यांत २.९४ कोटी खाती बंद करण्यात आली. मार्च महिन्यात सर्वाधिक ७९ लाख ५४ हजार खाती बंद झाली.

-व्हॉट्सअपकडून कारवाईमध्ये वाढ

२०२३ मध्ये व्हॉट्सअपकडून वर्षभरात एकूण ८ कोटी ३७ लाख ४२ हजार २६३ खाती बंद करण्यात आली होती. दर महिन्याची सरासरी ६९ लाख ७८ हजार ५२१ इतकी होती. मात्र या वर्षी कारवाईत आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी दर महिन्याची सरासरी ७३ लाख ७३ हजार इतकी आहे. यंदा कारवाईत ५.६२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

-सायबर फ्रॉडशी संबंधित खात्यांचे प्रमाण अधिक

भारतात अस्तित्वात असलेल्या तसेच माहिती व तंत्रज्ञान खात्याने लागू केलेल्या डिजिटल मीडियासाठीच्या नियमांचा भंग केल्यावरून ही कारवाई करण्यात येत आहे. व्हॉट्सअपकडून ज्या युझर्सची खाती बंद करण्यात आली आहेत, ते आता या मॅसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार नाहीत. यातील बहुतांश खाती सायबर फ्रॉड आणि घोटाळ्यांशी संबंधित आहेत, तर काहींनी व्हॉट्सॲपच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे अहवालात उघड झाले आहे. अनेक खात्यांच्या माध्यमातून निवडणुकांच्या जाहिराती तसेच टेलिमार्केटिंग करण्यात येत होते. व्हॉट्सअपकडून ॲडव्हान्स लर्निंग मशीन, डेटा ॲनालिसिस व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कारवाई करण्यात येते.

२०२३ मधील कारवाई

महिना : बंद झालेली खाती

जानेवारी २०२३ : २९,१८,०००फेब्रुवारी २०२३ : ४५,९७,४००मार्च २०२३ : ४७,१५,९०६एप्रिल २०२३ : ७४,४२,५००मे २०२३ : ६५,०८,००९जून २०२३ : ६६,११,७००जुलै २०२३ : ७२,२८,०००ऑगस्ट २०२३ : ७४,२०,७४८सप्टेंबर २०२३ : ७१,११,०००ऑक्टोबर २०२३ : ७५,४८,०००नोव्हेंबर २०२३ : ७१,९६,०००डिसेंबर : ६९,३४,०००

२०२४ मधील कारवाई

महिना : बंद झालेली खातीजानेवारी २०२४ : ६७,२८,०००फेब्रुवारी २०२४ : ७६,२८,०००मार्च २०२४ : ७९,५४,०००एप्रिल २०२४ : ७१,८२,००० 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप