ठळक मुद्दे३२० बसची सेवा बंद१.६० लाख प्रवासी व विद्यार्थ्यांचे प्रचंड हालथकबाकी न मिळाल्याने रेड बस आॅपरेटरचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच 'आपली बस' या शहर बस सेवेची जबाबदारी असलेल्या तीन रेड बस आॅपरेटरने ४५ कोटींची थकबाकी न मिळाल्याने शनिवारी सकाळपासून ३२० बसची सेवा बंद केली आहे. अचानक बस बंद ठेवण्यात आल्याने १.५५ लाख ते १.६० लाख प्रवासी व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. दिवसभरात कोणताही तोडगा न निघाल्याने रविवारीसुद्धा बस सुरू होण्याची शक्यता दिसत नाही.रेड बस आॅपरेटर आर. के. सिटी बस आॅपरेटर (नागपूर) प्रा.लि., ट्रॅव्हल टाइम सिटी बस व हंसा सिटी बस सर्व्हिसेस (नागपूर) प्रा.लि.यांची प्रत्येकी १५ कोटी अशी एकूण ४५ कोटींची थकबाकी आहे. आपली बस सेवा बंद असल्याने शहरातील आॅटो चालकांनी शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी व नोकरदार यांच्याकडून दामदुप्पट भाडे वसूल केले.सर्व रेड बस आॅपरेटरने शुक्रवारी बिलाची रक्कम न मिळाल्याने शनिवारपासून बस सेवा बंद ठेवण्याबाबत प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, महापौर नंदा जिचकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आदींना पत्राच्या माध्यमातून माहिती दिली होती.गेल्या आठवड्यात आॅपरेटरला वित्त विभागाकडून कोणत्याही स्वरुपाची रक्कम मिळाली नाही. वित्त विभागाचा प्रभार सांभळणारे उपायुक्त नितीन कापडनीस यांनी चर्चा सुरू ठेवली. पण बिल देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे बस सेवा बंद होण्याला महापालिकेचे संबंधित अधिकारी जबाबदार असल्याची चर्चा आहे.विशेष म्हणजे थकबाकी न मिळाल्याने रेड बसच्या आॅपरेटरने यापूर्वी एक दिवस बस बंद ठेवली होती. त्यानंतर प्रत्येकी अडीच कोटी देण्यात आले होते. यावेळी प्रशासनाकडून आॅपरेटरला प्रत्येकी ७५ लाख सोमवारी देण्याचा पर्याय दिला होता. परंतु कर्मचाऱ्यांचे वेतन,डिझेल व दुरुस्तीचा खर्च विचारात घेता प्रत्येकी तीन कोटींची मागणी आॅपरेटरने केली. वाटाघाटी फिसकटल्याने बस बंद ठेवण्याबाबतचे पत्र देण्यात आले.ग्रीन बसची सेवा १२ आॅगस्टपासून बंद करण्यात आली आहे. आता आयबीटीएस आॅपरेटर डिम्ट्सने पाच कोटी थकबाकी न मिळाल्यास सेवा बंद करण्याचे पत्र परिवहन विभागाला दिले आहे. या परिस्थितीचा विचार करता परिवहन सेवा पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्व आॅपरेटरची एकूण थकबाकी ६२.७५ कोटी आहे. बिकट आर्थिक स्थितीचा विचार करता महापालिकेला ही रक्कम जुळविणे अवघड दिसत आहे.परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे म्हणाले, शहर बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन व आॅपरेटर यांच्यात अनेकदा चर्चा झाली. परंतु निधीअभावी थकीत रक्कम देता आलेली नाही. लवकरात लवकर सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे.बससेवेबाबत सत्तापक्ष गंभीर नाहीशहर बससेवेच्या कारभाराची सर्वांनाच कल्पना आहे. थकबाकीसंदभांत आॅपरेटरने प्रशासन व पदाधिकाºयांना आजवर ९२ वेळा पत्र दिले. परंतु त्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: परिवहन सेवा सक्षम करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही महापालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. बससेवा सुरुळीत सुरू राहावी यासाठी महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी व स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा आदींनी अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही.परिवहन विभागाकडे अशी आहे थकबाकीआॅपरेटर थकबाकी (कोटी)ट्रॅव्हल टाइम सिटी बस - ११.८६हंसा सिटी बस सर्व्हिसेस - ११.८६आर.के. सिटी बस आॅपरेटर - १२ग्रीन बस आॅपरेटर : स्कॅनिया - १०आयबीटीएम आॅपरेटर : डिम्ट्स- ५युनिटी सिक्युरिटी- १.७५एसआयएस इंडिया लि. - १