कार्यक्रमाला देशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महिंद्रा उद्योगसमूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा हे देखील यावेळी आवर्जून उपस्थित होते. सकाळपासूनच ते स्मृतिमंदिर परिसरात होते. कार्यक्रमस्थळी ते चक्क ‘ई-टॅक्सी’तून आले व सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. विशेष म्हणजे कुठलाही बडेजावपणा न मिरविता ते सर्वसाधारण व्यक्तीसारखेच वावरत होते. परत जातानादेखील ते ‘ई-टॅक्सी’तूनच गेले, हे विशेष.
आनंद महिंद्रा ‘ई-टॅक्सी’तून येतात तेव्हा...
By admin | Published: June 09, 2017 2:33 AM