जेव्हा भाजप, आरएसएस संविधानावर हल्ला करतात तेव्हा ते भारताच्या आवाजावर हल्ला करतात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 03:33 PM2024-11-06T15:33:46+5:302024-11-06T15:37:59+5:30
Nagpur : नागपुरात महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नागपुरात आले होते. त्यांनी दीक्षाभूमीला भेट देत संविधानाच्या शिल्पकारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, भाजप आणि RSS जेव्हा संविधानावर हल्ला करतात तेव्हा ते भारताच्या आवाजावर हल्ला करतात. देशात जात जनगणना करणे हे त्यांचे पहिले उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रात प्रचाराची सुरवात करण्यासाठी नागपूरची निवड करण्यावरूनच निवडणुकीच्या दृष्टीने विदर्भाचे महत्व लक्षात येते. राहुल गांधींची हि भेट महत्त्वाची आहे कारण या भागात भाजपशी 76 पैकी जवळपास 36 थेट लढती होतील. भाजपने विदर्भात 47 उमेदवार उभे केले आहेत.
मुंबईतील "स्वाभिमान सभा" कार्यक्रमादरम्यान महाविकास आघाडीच्या मतदान हमी जाहीर होण्याची शक्यता आहे. या सभेत गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. शेतकरी कर्जमाफी, जातीची जनगणना आणि एकनाथ शिंदे सरकारच्या माझी लाडकी बहिन योजनेचा मुकाबला, ज्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा केले जातात, एक सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न योजना अशा महत्त्वाच्या योजनांची हमी महाविकास आघाडीकडून दिली जाण्याची शक्यता आहे.