लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शस्त्रांच्या जोरावर मध्य नागपुरात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी नागरिकांसमोरच ‘परेड’ घेतली. पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत निर्भयपणे गुन्हेगारांविरु द्ध तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. उपराजधानीला भयमुक्त करण्यासाठी शहर पोलिसांनी हा अनोखा पुढाकार घेतला. याबाबत पोलिसांची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.मंगळवारी पहाटे गुन्हेगारांनी सेंट्रल एव्हेन्यूच्या सेवासदन चौक आणि संत्रा मार्केटमध्ये जोरदार हैदोस घालत दहशत पसरवली. या घटनेला पोलिसांनी अतिशय गांभीर्याने घेतले आहे. पोलिसांनी अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याचे निश्चित केले आहे. पोलिसांनी मंगळवारी रात्रीच आरोपी फैजान खान व त्याचा साथीदार अजय ठाकूर याला अटक केली. सेवासदन चौकातील नागरिक अनेक दिवसांपासून या गुन्हेगारांमुळे त्रस्त होते. परंतु वाद वाढू नये म्हणून ते पोलिसात तक्रार करीत नव्हते. त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत आणखी वाढली होती. त्यामुळे ते दहशत पसरवित होते. या गुन्हेगारांविरुद्ध कारवाईसाठी नागरिकांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी आरोपीला अद्दल घडवण्याचे निश्चित केले. बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजता झोन तीनचे डीसीपी राहुल माकणिकर यांच्या नेतृत्वात पोलीस पथक सेवासदन चौकात पोहोचले. तिथे गुन्हेगारांनी पोलिसांना घटनास्थळ दाखवले. याची माहिती होताच नागरिकांनीही गर्दी केली. आरोपीला पाहून लोक संतापले. त्यांनी आरोपीला आमच्या स्वाधीन करा, अशी पोलिसांना विनंती केली. या गुन्हेगारांना आम्ही अद्दल शिकवतो, असे नागरिकांचे म्हणणे होते. ‘जशास तसे’ या धर्तीवर आरोपीसोबत व्यवहार व्हावा, असेही नागरिकांचे म्हणणे होते. नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पोलिसांनी संयमाने काम घेतले. त्यांनी गुन्हेगारांना नागरिकांसमोरच त्यांची जागा दाखवून दिली. डीसीपी राहुल माकणिकर यांनी गुन्हेगारांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन केले. ते म्हणाले की, गुन्हेगारांना घाबरण्याची गरज नाही. पोलीस नागरिकांसोबत आहेत. ते गुन्हेगारांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाहीत. डीसीपी माकणिकर यांच्या या प्रोत्साहनामुळे नागरिकांच्या चेहºयावरही आनंद पसरला. त्यांनी टाळ्या वाजवून पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत केले. माकणिकर यांनी नागरिकांना सांगितले की, ते कुणालाही न घाबरता गुन्हेगारांची तक्रार करू शकतात. यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन किंवा माझ्या कार्यालयातच येऊ शकता. मी नेहमीच तुमच्यासाठी उपलब्ध राहील. यादरम्यान सेवासदन चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.ताज्या झाल्या आठवणीपोलिसांच्या या भूमिकेमुळे जुन्या दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या. पूर्वी मोठ्या गुन्हेगारांना याच पद्धतीने घटनास्थळी किंवा त्यांचा दबदबा असलेल्या परिसरात आणून गुन्हेगारांची धुलाई केली जात होती. त्यावेळचे अनेक ठणेदार अशा धुलाईसाठी प्रसिद्ध होते. यात रमेश मेहता, जयप्रकाश बोधनकरसारखी अनेक नावे आहेत. ज्यांनी मोठमोठ्या गुन्हेगारांची सार्वजनिक धुलाई केली होती. मानव अधिकार संघटना आणि सोशल मीडियाच्या सक्रियतेमुळे आता अशाप्रकारची कारवाईपासून वाचले जाते.कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगारांना ठेचूगुन्हेगारांना ठेचण्यासाठी पोलीस कुठल्याही स्तरावर कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही. गुन्हेगारांसाठी शहरात कुठेही जागा नाही. मकोका, एमपीडीए सारखी कठोर कारवाई करून गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले जात आहे. अलीकडेच रेकॉर्ड प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. बहुतांश मोठ्या टोळ्यांचा सफाया करण्यात येत आहे. सराईत गुन्हेगार आणि त्यांच्या साथीदारांचाही लेखाजोखा तयार केला जात आहे.डॉ. भूषणकुमार उपाध्यायपोलीस आयुक्त
जेव्हा गुन्हेगारांची झाली परेड : नागपूर शहर पोलिसांचा अनोखा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:09 PM
शस्त्रांच्या जोरावर मध्य नागपुरात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी नागरिकांसमोरच ‘परेड’ घेतली. पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत निर्भयपणे गुन्हेगारांविरु द्ध तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. उपराजधानीला भयमुक्त करण्यासाठी शहर पोलिसांनी हा अनोखा पुढाकार घेतला. याबाबत पोलिसांची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.
ठळक मुद्देनागरिकांची वाढवली हिंमत