मोरेश्वर मानापुरे ल्ल नागपूरपरवाना नसलेल्या बँकांचे पुनरुज्जीवन करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत राज्य सरकार आणि जिल्हा बँकेने आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्या असून आता बँकिंग परवान्याची प्रतीक्षा आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची दाट शक्यता असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. प्रकिया पूर्ण, परवाना लवकरचबँकेने आर्थिक परवाना मिळविण्याचे सर्व निकष पूर्ण केले आहे. शासनाने बँक सुरू करण्यासाठी आवश्यक १५६ कोटी ५६ लाख रुपये बँकेला दिले आहेत. एकूण रकमेपैकी १३१ कोटी ७४ लाख रुपये मार्च २०१५ ला आणि नाबार्डच्या तपासणीनंतर आवश्यक उर्वरित २४ कोटी ८२ लाख रुपये १८ नोव्हेंबर २०१५ रोजी दिले आहेत. यात केंद्र शासनाचा ५२ कोटी ७१ लाख, राज्याचा ९० कोटी ६८ लाख आणि नाबार्डचा १३ कोटी १७ लाख रुपये वाटा आहे. अखेरचा हप्ता १८ नोव्हेंबरला दिल्यानंतर नोव्हेंबरच्या अखेरीस नाबार्डच्या विभागीय कार्यालयाने तपासणी केली. नाबार्डने अहवाल मुंबईतील मुख्य कार्यालयाला पाठविला. त्यानंतर मुख्य कार्यालयाने हा अहवाल नागपुरातील रिझर्व्ह बँकेकडे सोपविला. तपासणीनंतर रिझर्व्ह बँकेने अहवाल अंतिम निर्णयासाठी मुंबईतील रिझर्व्ह बँकेला दिला. या प्रक्रियेला नोव्हेंबरपासून जवळपास साडेतीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. सध्या बँक बँकिंग परवान्याच्या प्रतिक्षेत आहे. आज, उद्या केव्हाही परवाना मिळू शकतो, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील अधिकृत सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज मिळणारबँकेचे आर्थिक व्यवहार सुरू होताच आॅक्टोबरनंतर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पूर्वी कर्जाचा भरणा केलेल्या वा आता करीत असलेल्यांचा नंतर विचार करण्यात येणार आहे. मार्चच्या प्रारंभीपासूनच १०० कोटी, त्यानंतर ५० कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. बँक सुरू होताच एनपीए कमी होणार आहे. एक लाखापर्यंत शून्य टक्के आणि दोन लाखांपर्यंत २ टक्के व्याजदराने कर्जवाटप होणार आहे. याशिवाय ठेवी परतची प्रक्रिया रिझर्व्ह बँकेचे नियम आणि अटींनुसारच होईल.रिझर्व्ह बँकेने २५ जुलै २०१४ रोजी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या जिल्हा बँकेच्या आर्थिक व्यवहारावर बंदी टाकली होती, पण आवश्यक देवाणघेवाणचे व्यवहार सुरू होते. ३१ जानेवारी २०१६ पर्यंत बँकेची आर्थिक स्थिती ४७ टक्के सीआरएआर (३१ मार्च २०१५)४३.५० लाख ठेवीदार४८७६ कोटी ठेवी४३१.७० कोटी नेटवर्थ४५०५.६० कोटी गुंतवणूक४६१६.५६ कोटींचे कर्जवाटप (४५०.७९ कोटी कृषी कर्ज, १६५.७७ कोटी इतर कर्ज)४८४ शाखा, सर्व शाखा सीबीएस४परवान्यानंतर एटीएम सेवा देणार
जिल्हा बँकेला परवाना कधी ?
By admin | Published: February 23, 2016 3:34 AM