शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तिच्या मरणयातना संपणार केव्हा ?

By admin | Published: May 30, 2017 1:37 AM

लहानपणापासून तिला आयुष्याकडून मिळाल्या त्या यातनाच. घरात अठराविश्वे दारिद्र्य. जगण्याचा संघर्ष करताना शिक्षणाची इच्छा नाहीशी झाली.

मुलांना जगविण्यासाठी एचआयव्ही पीडित मातेची तळमळ : नशीबात तिरस्काराचे अमानवीय भोग निशांत वानखेडे। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लहानपणापासून तिला आयुष्याकडून मिळाल्या त्या यातनाच. घरात अठराविश्वे दारिद्र्य. जगण्याचा संघर्ष करताना शिक्षणाची इच्छा नाहीशी झाली. औरंगाबादमध्ये सुधारगृहात दिवस काढताना अधीक्षिकेने एका व्यक्तीशी तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर आयुष्य पालटणार असा विचार करताना काही दिवस सुखाचे गेले. परंतु पतीच्या व्यभिचारी वृत्तीमुळे पुढे आयुष्याची धूळधाण झाली. त्याच्याकडून तिला सुखाऐवजी मिळाला तो ‘एड्स’ नावाचा गंभीर आजार. यातून नातेवाईक आणि समाजाकडून मिळाली अमानवीय घृणा आणि तिरस्कार. या यातना भोगताना मरण जवळ करावे असे तिला वाटलेही. मात्र पोटच्या दोन मुलांसाठी तिला जगायचे आहे. दु:ख उरात भरूनही मुलांना जगविण्यासाठी, शिकविण्यासाठी या मातेची तळमळ मन हेलावणारी आहे. संवेदनशील समाजाकडून तिला मदतीची आस आहे. मनाला चटका लावणारी ही वेदनादायी कथा शुभांगीची (नाव बदल) आहे. तिचे माहेर नागपूरचे. घरच्या गरीब परिस्थितीमुळे हुशार असूनही तिला शिकता आले नाही. खेळण्या-बागडण्याच्या वयात आईसोबत लोकांच्या घरी धुणीभांडी आणि मिळेल ते काम करून पोटाची खळगी भागवणे एवढेच तिला ठाऊक. तरुण वयात एक मुलासोबत तिचे प्रेमही झाले. मात्र त्याने लग्नास नकार दिला व त्यामुळे आजीने तिला नागपुरातील बालसुधारगृहात घातले. तिला शिकण्याची इच्छा होती. तिने नागपुरातून दुसरीकडे पाठविण्याची विनंती केली. येथून तिला औरंगाबादच्या सुधारगृहात पाठविण्यात आले. येथे तीन वर्षे तिने घालविली. यादरम्यान सुधारगृहात मिळणाऱ्या असुविधांची तक्रार केल्यामुळे अधीक्षिकेला राग आला. शुभांगीला हाकलण्याच्या प्रयत्नात अधीक्षिकेने थेट तिच्या मनाविरुद्ध एका व्यापारी कुटुंबात तिचे लग्न लावून दिले. पतीसोबत काही दिवस सुखात गेल्यामुळे आता वाईट दिवस संपले असे तिच्या मनाला वाटले. यादरम्यान तिला मुलगा झाला. मात्र वर्ष-दीड वर्षात हे दिवस संपून आयुष्यात नव्या यातना सुरू झाल्यात आणि यावेळी या दु:खाचे रूप अधिक तीव्र होते. पतीला व्यभिचाराची सवय जडली आणि यातून एका भयंकर आजाराला आमंत्रण दिले. तो एचआयव्ही बाधित झाला. यादरम्यान पत्नीसोबत संपर्क केल्याने तिलाही याची लागण झाली. २००८ साली या आजाराची माहिती तिला कळली आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. या आजारातून मोठा मुलगा सुरक्षित राहिला, परंतु पती-पत्नीसमवेत लहान मुलगी या आजाराच्या विळख्यात सापडली. यानंतर मात्र शुभांगीच्या यातनांनी कळस गाठला. आधी गरिबीचा संघर्ष होता, पण लोक प्रेमाने जवळ घ्यायचे. मात्र एचआयव्ही बाधित असल्याने सुरुवातीला कुटुंबीयांनी व नंतर समाजानेही त्यांचा तिरस्कार सुरू केला. सुरक्षित असलेल्या मोठ्या मुलासकट त्यांना घृणेच्या नजरेने पाहिले जाऊ लागले. कुणी जवळ येऊन मदत करायला तयार नाही. परिस्थिती इतकी विदारक होती, की रात्री घरातील खरकटे खाऊन पती व मुलांसोबत दिवस काढण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. अशा मरणयातना भोगताना तिने एक दिवस झोपेच्या गोळ््या खाऊन मृत्यू जवळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला तिच्या वेदना संपवायच्या नव्हत्या. ती वाचली दु:खाचे डोंगर फोडण्यासाठी. आजाराने पती खंगला आहे. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर आहे. अशावेळी औरंगाबाद सोडून तिने नागपूरला माहेर गाठले. अंथरुणावर खिळलेल्या पतीलाही सोबत आणले. माहेरी आली असली तरी तसाच तिरस्कार व तशीच घृणा तिला अजूनही भोगावी लागत आहे. कुटुंबाच्या पालनपोषणासाठी ती काम करण्यास तयार आहे, मात्र कुणी काम देईनात. कुणी मदत करण्यास तयार नसल्याने एक वेळच्या अन्नासाठीही तिला संघर्ष करावा लागत आहे. या पराकोटीच्या वेदनांमुळे ती असाहाय्य झाली आहे. मात्र आपल्या चिमुकल्यांना चांगले भविष्य देण्याची जिद्द तिने सोडली नाही. ही जगण्याची धडपड करताना तिने लोकमतकडे मदतीची याचना केली आहे. संवेदनशील नागरिकांनी व संघटनांनी तिच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. तिला मदत करण्यासाठी ८९८३८४२६१८ या क्रमांकावर संपर्क क रून आपली मदत पोहचविल्या जाऊ शकते. मोठा मुलगा सुरक्षितया आजारातून तिचा मोठा मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहे. ११ वर्षांचा हा मुलगा अभ्यासात हुशार आहे. एवढेच नाही तर त्याची चित्रकला कुणालाही मोहून टाकेल एवढी सुरेख आहे. मात्र आईवडिलांच्या नियतीमुळे त्याचेही आयुष्य अंधारमय होईल का, ही भीती त्या मातेला वाटत आहे.