शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
3
Donald Trump : "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट
4
Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर आपटले, एकाच दिवसात Silver ₹२२६८ नं झालं स्वस्त; पाहा नवे दर
5
“ज्या नावांची चर्चा असते, ते मुख्यमंत्री होत नाहीत”; विनोद तावडे यांचे विधान चर्चेत
6
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
7
चौरंगी फाईट, वातावरण टाईट, दीपक केसरकर चक्रव्यूह भेदणार की...
8
AUS vs IND BGT : ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात'
9
“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे
10
"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?
11
"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी
12
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
13
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
14
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल
15
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
16
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
17
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
18
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
19
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
20
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!

इस्राईलच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था कधी? नागपूरच्या घटनेमुळे विषय पुन्हा ऐरणीवर, कैदीच बनलेत सुरक्षा रक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 9:50 PM

 आयुष निर्मल पुगलिया (वय २७) या कैद्याची येथील मध्यवर्ती कारागृहात निर्घृण हत्या झाल्याने नागपूरसह राज्यभरातील कारागृहांमधील कैद्यांची भांडणं आणि सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेला आली आहे.

- नरेश डोंगरे 

नागपूर, दि. 11 -  आयुष निर्मल पुगलिया (वय २७) या कैद्याची येथील मध्यवर्ती कारागृहात निर्घृण हत्या झाल्याने नागपूरसह राज्यभरातील कारागृहांमधील कैद्यांची भांडणं आणि सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेला आली आहे. सरकारकडून महाराष्ट्रातील कारागृहात इस्राईलच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था उभारण्याची घोषणा झाली. मात्र, तूर्त ती कागदांवरच आहे. अनेक ठिकाणी कर्मचारी नसल्यामुळे खतरनाक कैदीच कारागृहात सुरक्षा रक्षक म्हणून कारभार करीत आहेत. 

 अंडरवर्ल्डच्या टोळ्यांमधील गुंडांची भांडण आणि त्यांचे गेम पूर्वी मुंबई आणि पुण्यातील येरवडा कारागृहात व्हायचे. इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी मोहम्मद कतिल मोहम्मद जाफर सिद्धीकी याची येरवडा कारागृहात शरद मोहोळ आणि आलोक भालेराव या गुंडांनी ८ जून २०१२ ला गळा आवळून हत्या केली होती. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर नाशिकच्या कारागृहात १६ आॅक्टोबर २०१३ ला विशाल बाळासाहेब चौधरी याची सोपान सुदाम पगारे याने खिळ्याची पाटी डोक्यात घालून हत्या केली. यामुळे हादरलेल्या कारागृह प्रशासनाने राज्यातील खतरनाक कैद्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलविणे सुरू केले. तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित कारागृह अशी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाची ख्याती होती.  मुंबई-पुण्यात ऐषोरामाची सवय जडलेल्या गुन्हेगारांनी नागपूरच्या कारागृहातील अधिकारी-कर्मचाºयांच्या खिशातही नोटांचे बंडल कोंबले.  येथील भ्रष्ट अधिका-यांमुळे हे मध्यवर्ती कारागृह खतरनाक कैद्यांचे नंदनवन बनले. कैद्यांना डनलॉपच्या गाद्यांसोबत मेवा-मिठाई, चिकन, मटण, दारू, गांजा अन् ऐषोरामाच्या सर्वच चीजवस्तू उपलब्ध करून दिल्या जाऊ लागल्या. (हे धक्कादायक वास्तव वेळोवेळी लोकमतने उघड केले. लोकमतने या संबंधाने तशी व्हिडीओ क्लीपच व्हायरल करून खळबळ उडवून दिली होती.) त्यानंतर या कारागृहात हत्या आणि हत्येचा प्रयत्न (प्राणघातक हल्ला) करण्याच्या घटनांची मालिकाच सुरू झाली. २९ नोव्हेंबर २०१५ ला अल्पेश शालिक वानखेडे या कैद्याला बेदम मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तो हत्येचाच प्रकार असल्याची ओरड झाली. २० जानेवारी २०१६ ला अनुराग ऊर्फ विनोद राजकुमार खन्ना याचाही बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाला. हा हत्येचाच प्रकार असल्याचा जोरदार आरोप झाला. चार वर्षांपूर्वी एका बराकीत दोन कैद्यांनी एकाची गळा दाबून हत्या केली. 

हे प्रकरणही त्यावेळी गाजले. २३ जून २०१७ ला भायखळाच्या कारागृहात मंजुळा शेट्येची हत्या झाली. येरवडाच्या कारागृहात दहशतवादी कतील सिद्धीकीव्यतिरिक्त सुखदेव मेघराज मेहकारकर याची दिनेश दबडेने हत्या केली. या बहुचर्चित हत्याकांडाची चर्चा कारागृह प्रशासनात ताजीच असताना आता आयुष पुगलियाची हत्या झाली. अशा घटना घडल्या की कारागृहातील सुरक्षा व्यवस्था कडक करणार, अशी घोषणा केली जाते. प्रत्यक्षात मात्र आणली जात नाही. नागपूरच्या कारागृहात इस्राायलच्या धर्तीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्याची घोषणा होऊन आता सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. इस्रायलचे पथकही त्यासाठी येथे येऊन गेले. मात्र, सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा झाली नाही.  

दहशतवादी सांभाळतात कैदी 

नागपूरच्या कारागृहातील रचना आणि मर्यादा ९०० कैद्यांची आहे. प्रत्यक्षात येथे २,४०० कैदी आहेत. खतरनाक नक्षलवादी,मुंबई- पुण्यातील बॉम्बस्फोटांसह ठिकठिकाणी झालेल्या घातपाताच्या घटनेतील दहशतवादी, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि अनेक टोळ्यातील शूटरचाही त्यात समावेश आहे. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी केवळ २०० अधिकारी-कर्मचा-यांवर आहे. दोन पाळीत ते काम करतात. अर्थात एका पाळीत १०० अधिकारी-कर्मचारी असतात. त्यात १० जण सुटीवर, १० जणांची साप्ताहिक रजा असते. १० ते १५ जण दुसºया जबाबदारीत गुंतले असतात. उरलेले ६५ ते ७० कैदी २,४०० कैद्यांना सांभाळण्याची कसरत कशी करीत असतील, त्याची कल्पनाच न केलेली बरी. हीच अवस्था राज्यभरातील कारागृहांची आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येकच कारागृहात खतरनाक कैदीच सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात तर काही कैद्यांसह मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दहशतवादी अब्दुल गनी तुर्क आणि मोहम्मद अजगर हे दोघे सुरक्षा रक्षक म्हणून कैद्यांना सांभाळण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.

भांडण, हाणामारी रोजचीच !

कारागृहात कैद्यांमधील भांडणं नेहमीचाच प्रकार झाला आहे. एकमेकांवर प्राणघातक हल्ला करण्याच्या घटनाही नेहमीच घडतात. अनेक घटनांची पोलिसात तक्रार होत नसल्याने त्या  बाहेर चर्चेला येत नाहीत.  जर्मन बेकरी हत्याकांडातील दहशतवादी हिमायत बेग आणि त्याच्या साथीदारांनी नागपुरातील बहुचर्चित युग चांडक अपहरण आणि हत्याकांडात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला राजेश धन्नालाल दवारे याला  २५ मे २०१६ ला बेदम मारहाण केली. त्याच्या हत्येचाही प्रयत्न केला. ५ जुलै २०१६ ला जांभुळकर आणि नागपूरे नामक कैद्यांनी चव्हाण नामक कैद्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. नारायण केवट याच्यावर २३ सप्टेंबर २०१५ ला, तर २०१४ च्या सप्टेंबर महिन्यात अमर लोहकरे याच्यावर आतमधील गुंडांनी प्राणघातक हल्ला चढवला होता. या व्यतिरिक्त अनेक अशा घटना आहेत की ज्या कारागृहाच्या बाहेर चर्चेलाच येत नाहीत. आंघोळीसाठी आणि नैसर्गिक विधीला अगोदर जाण्यासाठी कारागृहात त्यांच्यात जवळपास रोजच भांडणं होतात. याच कैद्यांपैकी काही जण (सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे) भांडण, हाणामारी करणारांना आवरत असतात. 

राज्य कारागृह प्रशासनाला हादरा

आयुष पुगलियाच्या हत्येमुळे राज्य कारागृह प्रशासनाला जोरदार हादरा बसला आहे. या संबंधाने कारागृह प्रशासन प्रमूख, अतिरिक्त पोलीस महासंचालक  डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी संपर्क करून ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली, अशी प्रस्तूत प्रतिनिधीने विचारणा केली. त्यावर बोलताना अद्याप काही स्पष्ट झाले नाही, असे ते म्हणाले. त्यांच्यात कोणते भांडण झाल्याचे आमच्या रेकॉर्डवर नाही. त्यामुळे हत्येसारखा गुन्हा कसा घडला, यावर भाष्य करता येत नाही. मात्र, या प्रकरणाला कारागृहातील कैदी, अधिकारी की कर्मचारी जबाबदार आहेत,त्याची चौकशी सुरू केल्याचे डॉ. उपाध्याय म्हणाले. या घटनेपासून बोध घेत राज्यातील सर्व कारागृहांच्या अधिका-यांना आज एक विशेष सूचना देण्यात आली असून, आपसात भांडणा-या कैद्यांवर विशेष लक्ष ठेवा, असे सूचविण्यता आले आहे, असेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हा