शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

चळवळ हुकमी झाली की ती वाहावत जाते! राजाभाऊ पोफळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:45 PM

कुठल्याही आंदोलनाची दखल घेतली गेली, त्याला राजकीय पाठबळ मिळाले, शासकीय आधार मिळाला की नंतर त्याची वाताहत होते, ती वाहवत जाते. त्याच स्थितीतून सध्या ग्राहक चळवळ गुजराण करीत असल्याची वेदना राजाभाऊ पोफळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देग्राहक चळवळीच्या स्थितीसंदर्भात व्यक्त केली नाराजीवयाच्या ८३ व्या वर्षीही चित्तवृत्ती अजूनही शाबूत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९७१-७२ चा काळ असेल. भाई बर्धन, साठे आणि दत्तोपंत ठेंगडी यांच्या कामगार आंदोलनांचा जोर वाढत होता. त्याचदरम्यान नागपुरात महालातील एका शमीवृक्षाच्या खाली भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी व राजाभाऊ पोफळी इतर कार्यकर्त्यांसोबत त्या दिवशी पार पडलेल्या यशस्वी संपाबाबत चर्चा करीत बसले होते. त्याचवेळी तेथे रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आले आणि आंदोलनात भरडल्या गेलेल्या ग्राहकांवर कटाक्ष टाकला. त्यांच्या त्या शब्दातून ग्राहकांच्या एकजुटीचा बिगुल वाजला आणि ग्राहक चळवळीचा पाया रोवला गेला. या चळवळीचे पहिले खांदेकरी ठरले ते राजाभाऊ उपाख्य दत्तात्रय गोपाळराव पोफळी. आज ते वयाची ८३ वर्षे पूर्ण करीत आहेत. प्रकृतीने अगदी जर्जर झाले आहेत. मात्र अशाही परिस्थितीत त्यांची चित्तवृत्ती शाबूत आहे आणि ग्राहक चळवळीविषयी ते भरभरून बोलतात.कुठल्याही आंदोलनाची दखल घेतली गेली, त्याला राजकीय पाठबळ मिळाले, शासकीय आधार मिळाला की नंतर त्याची वाताहत होते, ती वाहवत जाते. त्याच स्थितीतून सध्या ग्राहक चळवळ गुजराण करीत असल्याची वेदना राजाभाऊ पोफळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. खरे तर समाजासाठी कायदे असतात. मात्र, सध्या कायद्यासाठी समाज आहे का? अशी शंका समाजातील एकूणच वैचारिक स्थितीवरून त्यांनी व्यक्त केली. कामगार आंदोलनाच्या काळात उद्योगपती घराण्यांचा विरोध करताना प्रत्येक व्यापारी हा ग्राहक असतो, याचे भान नव्हते. हे भान जेव्हा आले तेव्हा ग्राहकहितासाठी काम करण्याची गरज भासली. तेव्हाही ग्राहकहिताचे कायदे होते. मात्र जागृती नव्हती आणि ते कायदे पाळले जात नव्हते. म्हणूनच १९७१-७२ मध्ये उपभोक्ता मंच उभी राहिले. द्विसाप्ताहिक सुरू झाले आणि १९७४ मध्ये विदर्भासाठी काम करणाऱ्या या संघटनेचे रूपांतरण अखिल भारतीय ग्राहक पंचायतमध्ये झाल्याचे राजाभाऊ सांगत होते.या संस्थेची धुरा दत्तोपंत ठेंगडी यांनी माझ्या खांद्यावर दिली. त्या काळात आंदोलने हिंसक व उग्र असत. आम्हीही तीव्र होतो मात्र वात्रट नव्हतो. त्याबद्दल वैचारिक विरोधक असलेले भाई बर्धन यांनीही कौतुक केले आणि नंतर आमच्या आंदोलनाचे अनुकरण सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. समाजाभिमुखतेसाठी सुरू झालेल्या ग्राहक चळवळीने अनेक यश पदरात पाडले आणि ग्राहकांचे हित साधले गेले. मात्र, आता ही चळवळ समाजाभिमुख असल्याचे दिसत नसल्याची खंतही राजाभाऊंनी व्यक्त केली. कायद्याच्या कचाट्यात अडकून पडलेली ग्राहक चळवळ, असे वर्तमान स्थितीसंदर्भात भाष्य करता येईल, असे ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :consumerग्राहकagitationआंदोलन