लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील बहुतांश बाजारपेठा ५ जूनपासून ‘ऑड-ईव्हन’सह नियमांच्या आधारे उघडणार आहेत. याकरिता नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) १३ सूत्री नियमांची यादी तयार केली आहे. त्याचे सक्तीने पालन करून व्यवसाय करण्याचे आवाहन चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी व्यापाऱ्यांना केले आहे.व्यापारी आणि ग्राहकांनी नियमांचे सक्तीने पालन केल्यास नागपुरात एक महिन्यात व्यावसायिक घडामोडी रुळावर येण्याची अपेक्षा आहे. नियमांचे पालन न केल्यास प्रशासनातर्फे दुकाने बंद केली जाऊ शकतात, अशी माहिती मेहाडिया यांनी चेंबरतर्फे आयोजित ऑनलाईन पत्रपरिषदेत दिली.मेहाडिया म्हणाले, कोविड संक्रमणाप्रति जागरूकतेसाठी चेंबर मनपाच्या सहकार्याने शहरात ३०० होर्डिंग लावणार आहे. तसेच चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार करून स्वदेशी उत्पादनांचा अवलंब करण्यासाठी चेंबर मोहीम राबविणार आहे. वाहतुकीची समस्या दूर झाल्यानंतर उत्पादनांच्या पुरवठ्यात कोणत्याही अडचणी येणार नाही. ऑड-ईव्हन आणि नियमांबाबत व्यापाऱ्यांमधील संभ्रम संघटनांनी दूर केला आहे. पत्रपरिषदेत चेंबरचे सचिव रामअवतार तोतला, उपाध्यक्ष संजय अग्रवाल, फारुकभाई अकबानी, अर्जुनदास आहूजा, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, पीआरओ राजू माखिजा उपस्थित होते.लघु व मध्यम व्यापाऱ्यांना मदत पॅकेज द्यावेमेहाडिया म्हणाले, १९ मार्चपासून लॉकडाऊन आहे. यादरम्यान व्यापाऱ्यांची दुकाने बंद होती. १९ ते ३१ मेपर्यंत काही दुकाने सुरू झाली. आता ५ जूनपासून दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली. लॉकडाऊनदरम्यान व्यापाऱ्यांचे ६ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत सरकारने लघु व मध्यम व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेजची घोषणा करावी.कोविड-१९ मध्ये व्यापाऱ्यांसाठी नियमसंचालक, कर्मचारी व ग्राहकांनी फेस मास्क घालणे आणि आरोग्य सेतू अॅप सुरू ठेवणे अनिवार्य आहे. संचालकांनी ग्राहकांसाठी दुकानात अतिरिक्त मास्क ठेवावेत.प्रतिष्ठानाच्या प्रवेशद्वारावर हात धुण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी.प्रतिष्ठानात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात धुणे आणि सॅनिटाईज्ड करणे अनिवार्य करावे.प्रतिष्ठानाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक व्यक्तीचे तापमान तपासावे. त्याचे नाव, मोबाईल क्रमांक आणि तापमानाची रजिस्टरमध्ये नोंद करावी.जर शक्य असेल तर प्रवेशद्वार कर्मचाऱ्यांनी उघडावे आणि प्रवेशद्वाराचे हॅण्डल वेळोवेळी सॅनिटाईज्ड करावे.प्रतिष्ठानात दोन व्यक्तींमध्ये एक वा दोन फुटाचे अंतर ठेवावे. गर्दी होऊ देऊ नये.प्रतिष्ठानाला सकाळ, दुपार आणि सायंकाळी सॅनिटाईज्ड करावे.प्रतिष्ठानात उपयुक्त प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध करावे.ग्राहकांनी खरेदी केलेली वस्तू बदलून देऊ नये.रिटेल काऊंटरच्या कर्मचाऱ्यांनी हॅण्डग्लोज घालावे.प्रतिष्ठानचा माल फूटपाथ वा रस्त्यावर ठेवू नये.कपड्यांच्या दुकानात ट्रायलरूमची सुविधा देऊ नये.दुकान आणि सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करू नये.
दुकान उघडताना व्यापाऱ्यांनी करावे १३ सूत्री नियमांचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 12:34 AM
नागपुरातील बहुतांश बाजारपेठा ५ जूनपासून ‘ऑड-ईव्हन’सह नियमांच्या आधारे उघडणार आहेत. याकरिता नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) १३ सूत्री नियमांची यादी तयार केली आहे. त्याचे सक्तीने पालन करून व्यवसाय करण्याचे आवाहन चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी व्यापाऱ्यांना केले आहे.
ठळक मुद्देएनव्हीसीसीचे आवाहन : जनजागृतीसाठी एनव्हीसीसी लावणार ३०० होर्डिंग