लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शरीरातील अवयवांविषयी एक कुतूहल असते. प्रत्येकाला ते थेट पाहण्याची, त्याचे कार्य जाणून घेण्याची उत्सुकता असते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (मेडिकल) याच उद्देशाने अवयव प्रदर्शनाचे आयोजन केले होते. गेल्या तीन दिवसांत पाच हजार विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहिले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी हातात मेंदू, हृदय व इतरही अवयव घेत त्याच्या कार्याची माहिती जाणून घेतली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मानवी शरीरारातील अवयव जतन करून ठेवले जातात. ते अवयव सर्वसामान्य नागरिकांनाही पाहता यावेत म्हणून वर्षातून एकदा अवयवांचे प्रदर्शन भरविले जाते. यावर्षी मेडिकलच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात शहरातीलच नव्हे तर भंडाऱ्या जिल्ह्यातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.प्रदर्शनात मेंदू, हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, छोटी आतडी, मोठी आतडी, स्पायनल कॉड, स्वादूपिंड, हात, पाय, शरीरारातील वेगवेगळी हाडे, कवटी आदी अवयवांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला होता. हृदयाचे पपिंग, मेंदूच्या कोणत्या भागात कोणत्या शरीराचे कार्य अवलंबून असते. फुफ्फुसाला मोठे छिद्र कधी पडतात, लठ्ठ लोकांची चरबी यकृतात कशी जाते, यकृत निकामी कसे होते, मूत्रपिंडाच्या आत काय असते त्याचे कार्य कसे चालते, अशा अनेक गोष्टी येथे पहायला आणि शिकायला मिळाल्यात.प्रदर्शनात भेट देण्यास आलेल्या विद्यार्थी व लोकांच्या गर्दीचे मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले होते. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी उपअधिष्ठाता डॉ. डी.टी. कुंभलकर, स्टुडंट कौन्सिलचे प्रभारी डॉ. अविनाश गावंडे, डॉ. गणेश डाखले यांच्या नेतृत्वात स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष मयूर श्रीराव तसेच सरचिटणीस शुभम महल्ले यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांनी हातात घेतले मेंदू, हृदय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:29 PM
शरीरातील अवयवांविषयी एक कुतूहल असते. प्रत्येकाला ते थेट पाहण्याची, त्याचे कार्य जाणून घेण्याची उत्सुकता असते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (मेडिकल) याच उद्देशाने अवयव प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
ठळक मुद्देप्रदर्शनातून जाणून घेतली शरीरातील अवयवांची माहिती