कळमेश्वर : कळमेश्वर शहराचे नागरीकरण वाढत असताना ले-आऊटची संख्याही वाढत आहे. मात्र येथे नागरी सुविधा पुरविण्यात नगरपरिषद प्रशासन अपयशी होताना दिसत आहे. नगरपरिषदेला हस्तांतरित झालेले साईनगर ले-आऊट यातील एक. येथे खेळाच्या मैदानाला झुडपांनी वेढा घातला आहे. यासोबतच ले-आऊटमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या ले-आऊटमध्ये अनेकांनी घर बांधले, तेव्हा तिथे रस्तेही नव्हते. नगरपरिषद येथे नागरी सुविधा निर्माण करेल अशी प्लाॅटधारकांची अपेक्षा होती. मात्र यापैकी काहीएक झाले नाही. पावसाळ्यात येथे समस्यांत आणखी भर पडते. येथील रस्त्यावरून गाडी चालविणे नागरिकांना अडचणीचे होते. यासंदर्भात मुख्याधिकारी स्मिता काळे यांना विचारणा केली असता, साईनगर पाहणी करून येथील समस्यांचे निराकरण करणार असल्याचे सांगितले.
साईनगरचा विकास कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:12 AM