‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत लोकमत चमूने बुधवारी सकाळी नरसाळा भागात भेट दिली असता एक गृहिणी चुलीवर स्वयंपाक करीत होती. तीन विटा आणि त्याखालील सरपणावर हा स्वयंपाक सुरू होता. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नागपूर शहरालगतचे हे चित्र अस्वस्थ करणारे होते. शहराचा विकास होत असताना त्याला लागून असलेल्या परिसराचा विकास झाला तरच ती खऱ्या अर्थाने प्रगती ठरते. अलीकडेच केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ जाहीर केली आहे. दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या या गृहिणीच्या दारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कधी पोहोचेल, हा प्रश्न अजूनही अस्वस्थ करीत आहे. ( विशेष पान २ वर)
या उज्ज्वलाला गॅस कधी मिळणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2016 2:56 AM