भिवापूर : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात ग्राम रोजगार सेवक कार्यरत आहेत. मात्र प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असतानासुद्धा रोजगार सेवकांचे मानधन मागील कित्येक महिन्यापासून मिळालेले नाही. शिवाय इतर मागण्यासुद्धा प्रलंबितच आहेत. त्यामुळे मागण्या पूर्ण न झाल्यास कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. याबाबत तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
रोजगार सेवकांना गत सहा महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. प्रवासभत्तासुद्धा प्रलंबित आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. या मागण्यांसह २०१८ ते २०२१ या वर्षातील प्रोत्साहत भत्ता देण्यात यावा, शासन निर्णयातील अर्धवेळ असलेले काम पूर्णवेळ करण्यात यावे, इतर राज्याप्रमाणे रोजगार सेवकांना प्रतिमाह निश्चित वेतन देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिले आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अजित शंभरकर, जनार्धन कांबळी, बाळकृष्ण बावणे, रवींद्र वारके, विजय नारनवरे, गजानन डोरलीकर, प्रवीण गायकवाड, लीलाधर लोहबरे, संघर्ष भोंगे, गौरव शेंडे, गजानन पोपटकर, शुभम नारनवरे, विलास म्हैसकर, बाबाराव टाले, देवचंद करकाडे, बंडू मेश्राम आदींचा सहभाग होता.
250821\img-20210824-wa0065.jpg
तहसीलदार अनिरूध्द कांबळे यांना निवेदन देतांना संघटनेचे शिष्टमंडळ