लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून ‘पीएचडी’साठी दर्जेदार उमेदवारांचीच नोंदणी व्हावी, यादृष्टीने विविध पावले उचलण्यात आली आहेत. नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसमोरील आव्हान आणखी वाढले आहे. ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) आता कधी होणार, याबाबत इच्छुक उमेदवारांकडून विचारणा सुरू आहे. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ‘पेट’ होण्याची दाट शक्यता आहे.देशभरातील विद्यापीठांमध्ये ‘पीएचडी’ची बजबजपुरी माजली आहे. संशोधनाचा स्तर वाढावा यासाठी ‘यूजीसी’ने (युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन) अगोदरच पावले उचलली होती.नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळाल्यामुळे ‘पीएचडी’च्या स्तरातदेखील वाढ करण्याची प्रशासनाला आवश्यकता वाटत होती. त्यामुळे यासंदर्भात नागपूर विद्यापीठानेदेखील नवीन नियमावली जारी केली होती. पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५५ टक्के गुण अनिवार्य करण्यात आले होते. शिवाय नोंदणीसाठी ‘पेट’च्या २ परीक्षा उत्तीर्ण करण्याची अटदेखील लागू करण्यात आली. नियमावली कडक केल्यामुळे प्रत्यक्ष नोंदणी होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण घटले. केवळ दर्जेदार उमेदवारांचीच नोंदणी होऊ शकली.१७-१९ जानेवारी रोजी ‘पेट-१’ घेण्यात आली होती, तर १० फेब्रुवारी रोजी ‘पेट-२’चे आयोजन करण्यात आले. त्यानंतर पात्र उमेदवारांनी नोंदणीसाठी ‘सिनॉप्सिस’देखील सादर केले होते. मात्र अभ्यासमंडळांच्या निवडणुकांना विलंब झाल्यामुळे ‘आरआरसी’ गठित होण्यासदेखील वेळ लागला.आता ‘आरआरसी’च्या बैठकादेखील झाल्या आहेत. मात्र नोव्हेंबर महिना असूनदेखील अद्यापदेखील ‘पेट’बाबत काहीही घोषणा न झाल्यामुळे नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. याबाबत विविध पातळ्यांवर विचारणा करण्यात येत आहे.
वेळापत्रक लवकरच‘आरआरसी’ची प्रक्रिया आटोपली असून, आता विद्यापीठाकडून पुढील ‘पेट’साठी पावले उचलण्यात येण्यात आहेत. साधारणत: डिसेंबरच्या अखेरपर्यंत ‘पेट’ची पहिली परीक्षा घेण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असेल. नेमके वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.