शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

नाट्य परंपरेतील तटस्थतेला फाटा कधी फुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 4:08 AM

- जागतिक रंगभूमी दिन : आंतरराष्ट्रीय सेतू बांधण्यासाठी प्रयत्नांची उणीव - आविष्काराची जननी नाटक अडकले पुरातन क्रियाकलापांत प्रवीण खापरे ...

- जागतिक रंगभूमी दिन : आंतरराष्ट्रीय सेतू बांधण्यासाठी प्रयत्नांची उणीव

- आविष्काराची जननी नाटक अडकले पुरातन क्रियाकलापांत

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अभिव्यक्तीतले आविष्कार रसिकांपुढे सादर करणारे सर्वोत्तम माध्यम म्हणजे नाटक ही कला. मराठी रंगभूमीचा इतिहास १८४३ सालापासून सांगितला जात असला तरी भारतीय जनमानसाला नाट्यकलेची ओळख प्राचीन आहे. कीर्तन, पोवाडे, लोककला आदींतून नाट्यकलेचा विकास सुरूच होता. भरतमुनींनी प्राचीन काळातच नाट्यशास्त्र अर्थात पाचव्या वेदाची पायाभरणी केली होती. त्यानंतर कालिदास, भवभूती, भास, अश्वघोष, शुद्रका आदींची नावे संस्कृत, प्राकृत भाषेतील नाटकांतून पुढे येतात. नाट्य परंपरेचा वारसा आणि आविष्कार भारतीय कलावंत आणि रसिकांनी अखंडित चालविला आहे. मात्र, वर्तमान काळात या परंपरेला तटस्थतेचे घट्ट असे आवरण बसले आहे. नागपूर-विदर्भात हे आवरण फुटता फुटेना, अशी स्थिती आहे. याला फाटा फोडण्याचे प्रयत्न उणिवेनेच झालेले दिसून येतात.

नागपूर-विदर्भात अनेक नाटककार झाले आणि नाटककारांची घडणावळ चालूच आहे. मात्र, अजूनही डबक्यात साचलेल्या बेडकासारखीच स्थिती येथील नाटककारांची दिसून येते. त्यात नाट्यलेखक, दिग्दर्शक, अभिनेते-अभिनेत्री, तंत्रज्ञ आणि रसिक या सर्वांचा समावेश होतो. पारंपरिक फ्लॅटपिसमधली कौटुंबिक, रंजनात्मक, विनोदी नाटकांच्या पलीकडे नाटक आजही दिसून येत नाहीत. वैचारिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर जातिप्रथेवर, महिला विवंचनेवर, कृषी व्यथेवर आधारित नाटकांचे पीक आले आहे. मात्र, त्यात नावीन्यतेचा अभाव कायमच दिसून आला आहे. विशेष म्हणजे, जगभरातील नाट्य संस्कृतीत चाललेल्या घडामोडींपासून येथील रंगकर्मी अजूनही अलिप्त आहेत. आपल्या वैशिष्ट्यांमुळे देशाबाहेर येथील नाटकांना आमंत्रित केले जाईल, अशा कलाकृतींची संख्या निरंक आहे. येथील काही नाट्यसंस्थांनी देशाबाहेरचा प्रवास केला, राज्यभरात जाऊन पोहोचलेही. मात्र, चरित्र नाटक यापलीकडे त्यांचे कौशल्य दिसून येत नाही. स्पर्धेत अडकलेल्या नागपूर-वैदर्भीय रंगभूमीची अवस्था परीक्षकांच्या अनास्थेमुळेही दारुण झाली आहे. काही नाट्यप्रयोग तटस्थतेला फाटा फोडणारेही होते. मात्र, परीक्षकांच्या अज्ञानाने आणि रसिकांच्या उदासीनतेमुळे अशा आविष्कारी नाट्यप्रयोगांचा गाडा कधीच पुढे सरकू शकला नाही. शिवाय, आंतरराष्ट्रीय नाट्यक्षेत्राचा सेतू बांधण्यासाठी कलारसिक म्हणा व जाणकारांनी कधीच प्रयत्न केले नसल्याचेच दिसून येते.

-------------

जागतिक जाळे विणण्यात अपयशी

प्रत्येक क्षेत्राने आपापले जाळे विणण्याचे काम यशस्वीरित्या केले आहे. मात्र, नाटकांच्या बाबतीत हे जाळे विणण्यात अपयशच आले आहे. विशेष म्हणजे, असे प्रयत्न करावेसे कुणालाच वाटले नाहीत. देशाबाहेरचे सोडा, बंगाल, केरळ, उत्तर भारतात नाट्यसंस्कृतीचे अपडेट्स किती जणांकडे असतात, हा प्रश्न आहे. वेगवेगळ्या देशातील, प्रदेशातील नाट्य संस्थांनी नाट्यविषयक घोषणा करावी आणि वर्षभर त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. मात्र, याबाबतीत कुणीच जागरूक नाहीत.

- डॉ. विनोद इंदूरकर, ज्येष्ठ रंगकर्मी व राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्लीचे तज्ज्ञ सदस्य

----------------

सगळ्यांमध्येच जाणिवेची उणीव

नागपूरची हौशी रंगभूमी स्पर्धात्मक आहे. येथे नवे नाट्य आविष्कार झाले तरी परीक्षकांच्या अज्ञानामुळे ते मागे पडते. शिवाय, ज्येष्ठ रंगकर्मींनाही अशा आविष्कारात रस नसतो. रसिक तर दूरच राहिला. त्यामुळे, नाट्य आविष्कारविषयक जाणिवा समृद्ध करण्यासाठी परीक्षक, रसिक व रंगकर्मींना सज्ज व्हावे लागेल. मीसुद्धा ‘आख्यान फितरती चोर’ हे नाटक कीर्तनप्रकारात सादर केले होते. मात्र, पुढे पोहोचूच शकले नाही.

- पीयूष धुमकेकर, रंगकर्मी व माजी विद्यार्थी : राष्ट्रीय नाट्य विद्यालय

--------------

शिक्षणात नाटक नाही, हीच समस्या

आपल्याकडे नाटक ग्रॅज्युएशननंतर केले जाते, ही शोकांतिका आहे. शालेय जीवनातच नाटकाचे शिक्षण पाठ्यपुस्तकांत आले तर परिणाम दिसून येईल. नवआविष्कारांची प्रोसेस सुरू आहे. मात्र, ती गती अत्यंत धीमी आहे. याबाबत सगळ्यांनाच एज्युकेट व्हावे लागेल.

- मंगल सानप, रंगकर्मी व माजी विद्यार्थी : राष्ट्रीय नाट्यविद्यालय

......................

ब्रॉडवे, ऑफब्रॉडवे, ऑफ ऑफ ब्रॉडवे

‘’?!