शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

उच्च न्यायालयात कधी होतील नवीन न्यायमूर्तींच्या नियुक्त्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:17 AM

राकेश घानोडे नागपूर : सर्वोच्च न्यायालयाला इतिहासात पहिल्यांदा एकाचवेळी ९ नवीन न्यायमूर्ती देण्यात आल्यामुळे तब्बल ३३ पदे रिक्त असलेल्या ...

राकेश घानोडे

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाला इतिहासात पहिल्यांदा एकाचवेळी ९ नवीन न्यायमूर्ती देण्यात आल्यामुळे तब्बल ३३ पदे रिक्त असलेल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये नवीन न्यायमूर्ती कधी नियुक्त केले जातील, हा प्रश्न राज्यातील विधी क्षेत्रात उपस्थित झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात एवढ्या मोठ्या संख्येत न्यायमूर्तींची पदे रिक्त असल्याने प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत आहे, तसेच सध्या कार्यरत असलेल्या न्यायमूर्तींवर कामाचा ताण आहे.

रिक्त पदांमुळे प्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयात तातडीने नवीन न्यायमूर्ती नियुक्त करण्याच्या मागणीने जोर पकडला होता. नवीन नियुक्त्यांमुळे रिक्त पदांविषयी पाढा वाचणे बंद झाले आहे. आता सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या ३४ पदांपैकी केवळ एक पद रिक्त आहे. याच धर्तीवर मुंबई उच्च न्यायालयातही नवीन न्यायमूर्तींची आवश्यक संख्येत नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाला न्यायमूर्तींची ९४ पदे मंजूर असून त्यात ७१ कायम व २३ अतिरिक्त न्यायमूर्तींचा समावेश आहे. सध्या या न्यायालयात ५२ कायम व ९ अतिरिक्त असे एकूण ६१ न्यायमूर्तीच कार्यरत आहेत तर १९ कायम व १४ अतिरिक्त अशी एकूण ३३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे न्यायालयाच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.

------------------

देशात ४६५ पदे रिक्त

देशात २५ उच्च न्यायालये कार्यरत असून या सर्व न्यायालयांमध्ये कायम न्यायमूर्तींची २८१ व अतिरिक्त न्यायमूर्तींची १८४ अशी एकूण ४६५ पदे रिक्त आहेत. एकूण १०९८ (८२९-कायम, २६९-अतिरिक्त) मंजूर पदे आहेत.

------------------

रिक्त पदे भरण्याची गरज

सर्वोच्च न्यायालयात एकाचवेळी ९ नवीन न्यायमूर्तींची नियुक्ती करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. याच धर्तीवर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची रिक्त पदेही तातडीने भरणे गरजेचे आहे. रिक्त पदांमुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या सतत वाढत आहे. आवश्यक संख्येत नवीन न्यायमूर्ती मिळाल्यास न्यायदान गतिमान होईल.

----- ॲड. प्रफुल्ल खुबाळकर, सचिव, हायकोर्ट बार असोसिएशन, नागपूर.