शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

कचरामुक्त शहर कधी होणार?

By admin | Published: May 09, 2017 2:09 AM

घनकचरा व्यवस्थापन ही उपराजधानीतील मोठी समस्या बनली आहे.

ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे : कसे होणार ‘स्वच्छ’ नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घनकचरा व्यवस्थापन ही उपराजधानीतील मोठी समस्या बनली आहे. उपलब्ध माहितीनुसार रोज शहरातील एका घरातून सरासरी ३५० ते ४०० किलोग्रॅम कचरा निघतो. अशाप्रकारे संपूर्ण शहरातून प्रतिदिवशी एक हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक कचरा गोळा होतो. मात्र या सर्व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी दुर्दैवाने शहरात कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे शहरातील ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात. मग असे असताना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरला क्रमांक कसा मिळणार? आणि आपले नागपूर ‘स्वच्छ’ कसे होणार, असा सहज प्रश्न निर्माण होतो. शहरातील या कचरा व्यवस्थापनासाठी मनपा प्रशासनासह शहरातील नागरिकांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी रोज घराघरात ओला व सुका कचरा वेगवेगळा करावा लागेल. नागरिकांना स्वत:च आपल्या घरात दोन वेगवेगळे ‘डस्टबिन’ ठेवावे लागणार आहेत. यासाठी नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेतला पाहिजे. घनकचरा व्यवस्थापन ही नागपूरसारख्या विकासाकडे अग्रेसर असणाऱ्या शहरासाठी मोठी समस्या बनली आहे. सध्या ओला व सुका घनकचरा एकत्रच विसर्जित करण्यात येतो. यामुळे पर्यावरणाचे तसेच नागरी स्वास्थ्याचे मोठे प्रश्न निर्माण होतात. शहरात काही ठिकाणी कचरा वेगवेगळा गोळा करण्यात येतो, मात्र हे प्रमाण फार थोडे आहे. ओला व सुका कचऱ्याचे विभक्तीकरण न केल्यामुळे कचऱ्यावर विविध तांत्रिक प्रक्रिया करतानादेखील अडचणी येतात. तज्ज्ञांच्या मते, शहरात दररोज निघणाऱ्या कचऱ्यापैकी ६० टक्के कचऱ्याचे २४ तासात जैविकरीत्या विघटन करणे शक्य आहे. मात्र त्यासाठी घरांमधून निघणारा कचरा हा ओला आणि सुका वेगवेगळा झाला पाहिजे, अन्यथा तो विघटन होऊ शकत नाही. त्यामुळे जर घरापासूनच कचरा विलग होऊन आला तर घनकचरा व्यवस्थापनास नवी दिशा मिळेल, असेही सांगितले जात आहे. शहरातील सर्वात मोठा बाजार असलेल्या कळमना बाजारात वर्षभरात तब्बल ६,२७८ टनांहून अधिक कचरा गोळा होतो. यानंतर तो सर्व कचरा भांडेवाडी येथील ‘डम्पिंग यार्ड’मध्ये फेकला जातो. मात्र या ‘वेस्ट’वर जर योग्य प्रक्रिया झाली तर त्यापासून मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीसुद्धा होऊ शकते. उपराजधानीत रोज निघतो हजार मेट्रिक टन कचरारोज शहरातील प्रत्येक घरातून सरासरी ३५० ते ४०० किलोग्रॅम कचरा निघतो. यानुसार एका दिवशी संपूर्ण शहरात तब्बल एक हजार मेट्रिक टनाहून जास्त कचरा गोळा होतो. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे या घनकचरा व्यवस्थापनासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे. दररोज निघणाऱ्या या कचऱ्यापैकी ६० टक्के कचऱ्याचे २४ तासात विघटन होणे शक्य आहे. मात्र त्यासाठी नागरिकांना स्वत:च आपल्या घरातील कचरा हा ओला व सुका वेगवेगळा करावा लागेल. परंतु तसे होत नाही. प्रत्येक घरामधून निघणारा कचरा हा ओला-सुका असा मिश्र स्वरूपाचा असतो. त्यामुळे त्याचे विघटन होत नाही. कचरा व्यवस्थापनाचा अभाव मागील काही वर्षांत भांडेवाडी परिसर हा अक्षरश: कचऱ्याचे ‘डम्पिंग यार्ड’ बनले आहे. यातून या संपूर्ण परिसराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. शहरात घनकचरा व्यवस्थापनाची योग्य व्यवस्था नसल्याने दिवसेंदिवस कचऱ्याखाली येणाऱ्या जमिनीत वाढ होत आहे. ही समस्या दूर कशी होणार, हा प्रश्न स्थानिक प्रशासनाला सतावत आहे. मात्र या सर्व कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन झाले तर शहरातील ही समस्या सुटू शकते. परंतु त्यासाठी स्थानिक प्रशासनासह नागरिकांना पुढाकार घ्यावा लागेल. मनपाकडे अ‍ॅक्शन प्लॅन हवा ‘शहरातील कचरा व्यवस्थापनात नागपूर महानगरपालिकेची फार मोठी भूमिका आहे. परंतु मनपा आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसल्याचे दिसून येत आहे. मनपाने शहरातील कचरा गोळा करण्यासाठी कंत्राट दिला आहे. परंतु त्या कंत्राटातील गोष्टींचीसुद्धा योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरातील घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहराला स्वच्छ करायचे असेल तर यात नागरिकांचाही तेवढाच सहभाग लागणार आहे. त्यासाठी मनपा प्रशासनाने लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे, शिवाय एक अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून तो नागरिकांपर्यंत पोहोचविला पाहिजे. परंतु ते सुद्धा होताना दिसून येत नाही.’ अनसूया काळे-छाबरानीअध्यक्षा-‘स्वच्छ’ स्वयंसेवी संस्था. नागरिकांचा पुढाकार हवा ‘शहरात कचरा व्यवस्थापनाची खरंच मोठी समस्या आहे. मनपा प्रशासनातर्फे ही समस्या सोडविण्यासाठी भरपूर प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यात नागरिकांच्या पुढाकाराशिवाय यश मिळू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनीसुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. शिवाय कुठे तरी राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे. शहराला ‘स्वच्छ’ आणि ‘सुंदर’ बनविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. मात्र त्यात आपण कुठे तरी कमी पडत असल्यानेच राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता सर्वेक्षणात आपले शहर मागे पडले आहे. शेफाली दुधबळे,सचिव-‘स्वच्छ’ स्वयंसेवी संस्था.