शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

भंगारातील २० बस गेल्या कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:16 AM

महापालिकेच्या परिवहन विभागाच्या २३० बस खापरी व हिंगणा येथील डेपोत गेल्या सात वर्षापासून भंगारात पडून आहेत. अनेक बसचे टायर, सीट, स्पेअर पार्ट, तर काही बसचे इंजित बेपत्ता आहे. एवढेच नव्हे तर २० बसचा शोध घेतल्यानंतरही ठावठिकाणा न लागल्याने परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे७ वर्षापासून २३० बस भंगारात : अनेक गाड्यांचे स्पेअर पार्ट, चाक, इंजिन बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाच्या २३० बस खापरी व हिंगणा येथील डेपोत गेल्या सात वर्षापासून भंगारात पडून आहेत. अनेक बसचे टायर, सीट, स्पेअर पार्ट, तर काही बसचे इंजित बेपत्ता आहे. एवढेच नव्हे तर २० बसचा शोध घेतल्यानंतरही ठावठिकाणा न लागल्याने परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.मागील दहा वर्षापूर्वी महापालिकेने शहर बस सेवा चालविण्याचा निर्णय घेतला. ही जबाबदारी व्हीएनआयएल या खासगी कंपनीकडे सोपविली होती. आॅपरेटरने २३० बसेस सुरू करावयाच्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम अंतर्गत महापालिकेला मिळालेल्या ३०० बस खासगी आॅपरेटरक डे देण्यात आल्या.अशा प्रकारे शहरात ५३० बस सुरू करण्यात करण्यात येणार होत्या. परिवहन विभागाचा कारभार व्यवस्थित चालावा यांसाठी नागपूर महानगर परिवहन लिमिटेड (एनएमपीएल)ची स्थापना करण्यात आली. मात्र एमएमपीएलला परिवहन विभागाच्या कारभारात सुधारणा करण्यात यश मिळालेले नाही. प्परिणामी नवीन २३० बस भंगारात टाकाव्या लागल्या.शहर बस सेवेची महापालिकेने जबाबदारी स्वीकारण्याची प्रक्रिया १९९४ साली सुरू झाली होती. २००१ ते २००६ या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बस सेवेत २०.६८ कोटींचा तोटा झाला होता. याचा भार महापालिकेने स्वीकारावा, अशी मागणी परिवहन विभागाने केली होती. परंतु महापालिकेने नुकसान भरपाई देण्याला विरोध दर्शविला. त्यानतंर २००७ मध्ये महापालिकेला शहर बस सेवा चालविण्याला परवानगी दिली. त्यानुसार १०आॅक्टोबर २००७ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहर बस सेवेची जबाबदारी खासगी आॅपरेटरकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २००७ मध्ये महापालिका व व्हीएनआयएल यांच्यात करार झाला होता.करारानुसार व्हीएनआयएलला २३० बस शहरात सुरू करावयाच्या होत्या. यात १५० मोठ्या तर ८० मिनी बसचा समावेश होता. यातील २०० बस आॅपरेटरने खरेदी करावयाच्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारकडून ३०० बस महापालिकेला प्राप्त झाल्या. यातील २४० बस आॅपरेटरक डे सोपविण्यात आल्या. ६३.६० कोटीच्या या प्रकल्पात केंद्र सरकारचा वाटा ५० टक्के, २० टक्के राज्य सरकार तर ३० टक्के वाटा महापालिकेला उचलावयाचा होता. प्रकल्पानुसार ५३० बस शहरात धावणार होत्या. परंतु पूर्ण बस शहरात धावल्याच नाही. यातील २४० बस भंगारात पडून आहेत.भंगार समितीची आज बैठकभंगारात पडून असलेल्या २३० बसची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या परिवहन समितीने समितीचे उपसभापती प्रवीण भिसीकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. यात नितीन साठवणे व अर्चना पाठक यांचा समावेश आहे. गुुरुवारी समितीची बैठक आयोजित केली आहे. यात भंगार बसचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती प्रवीण भिसीकर यांनी दिली.जबाबदार कोण ?परिवहन विभागाच्या खापरी व हिंगणा येथील डेपोमध्ये भंगारातील बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत. येथे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे. असे असूनही बसचे स्पेअरपार्ट, टायर चोरीला गेले आहे. एवढेच नव्हेतर काही गाड्यांना इंजिनही नाही. यात महापालिकेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर