शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

जप्त आंबे गेले कुठे ?

By admin | Published: May 21, 2017 2:15 AM

कार्बाईडने अवैधपणे पिकविलेले आंबे जप्त करून भांडेवाडीत नष्ट केल्याचे आणि सुगंधित तंबाखू व निकृष्ट सुपारी विक्रेत्यांवर कारवाई

अन्न व औषध विभागाचा देखावा : फौजदारी कारवाई करा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कार्बाईडने अवैधपणे पिकविलेले आंबे जप्त करून भांडेवाडीत नष्ट केल्याचे आणि सुगंधित तंबाखू व निकृष्ट सुपारी विक्रेत्यांवर कारवाई करून जप्त केलेला माल जाळल्याचे अधिकारी सांगतात. पण पुराव्याअभावी त्यांच्या वक्तव्यात किती तथ्य आहे, हे पडताळून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. यंदा आंब्याच्या हंगामात अन्न व औषधी विभागाने केवळ एकदाच कळमना मार्केटमध्ये कार्बाईडने आंबे पिकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली आणि सुमारे १.६१ लाख रुपयांचा माल जप्त करून भांडेवाली डम्पिंग यार्डमध्ये नष्ट केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण जप्त केलेला माल अधिकाऱ्यांनी कुणाच्या उपस्थितीत नष्ट केला, याची नावे गुलदस्त्यात आहे. अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांना विचारणा केली असता काही सामाजिक संघटनांचे लोक यावेळी उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण यापूर्वीही अधिकाऱ्यांकडे मागणी केल्यानंतरही जप्त माल नष्ट केल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग कधीही दाखविले नाही, असा आरोप ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना केला. केकरे यांनी सांगितले, चार दिवसांपूर्वी जप्त केलेली निष्कृष्ट दर्जाची सुपारी आरोपीच्या प्रतिष्ठानमध्ये सील करून ठेवली असून नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. पुढे या सुपारीचे काय, हा गंभीर प्रश्न आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी विभागाने सुमारे आठ लाख रुपयांचा गुटखा व तंबाखू नष्ट केल्याची माहिती आहे. विभागाचे माल नष्ट केल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले असावे. तो व्हिडीओ अधिकाऱ्यांनी दाखवावा, असे संघटनांचे मत आहे. जप्त आंबे गेले कुठे ? तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी नागपुरात लगतच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत आहे. गुटखा माफियांसोबत अन्न व प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांचे असलेले लागेबांधे यामुळे शहरासह जिल्ह्यात अधिक प्रमाणात अवैध गुटखा विक्री होत आहे. कारवाईचा केवळ देखावा केला जात आहे. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांसह गुटखा शौकिनांचेही फावत आहे. तसेच खाद्यपदार्र्थांचे नमुने घेण्याच्या नावावर कारवाई केली जाते. सण आणि उत्सवाच्या काळात दरवर्षीच अन्न व प्रशासन विभाग कारवाईचा देखावा करत आपला हप्ता वाढवून घेतो, असा आरोप होत आहे. अपुरे कर्मचारी असल्याची ओरड न करता सहआयुक्तांनी कारवाई करण्याचा सपाटा लावावा, अशी ग्राहक संघटनांची मागणी आहे. दाल मिल, आॅईल मिल, बेसन मिल यांचे नमुने घेण्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात वसुली केली जाते. त्यामुळे याचा थेट परिणाम शरीरावर होत आहे. मात्र, यांचे काहीही सोयरसुतक अन्न व औषध प्रशासन विभागाला नाही, असा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे. सर्वच पानठेल्यांवर खर्रा उपलब्ध एका नामांकित कंपनीच्या गुटख्याची पुडी काळ्या बाजारात सुमारे ५० रुपयांत तसेच नागपुरातील सर्वच पानठेल्यांवर खर्रा सहजरीत्या उपलब्ध आहे. वर्षातून एकदाच कारवाई होत असल्यामुळे अधिकाऱ्यांचा धाक राहिला नाही. गुटख्याच्या विक्रीला अधिकाऱ्यांचे पूर्ण पाठबळ असल्यामुळे सर्रास विक्री होत असल्याचा आरोप होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी थातूरमातूर कारवाई करून जप्त केलेला माल व्यापाऱ्यांना परत करतात. जप्त आणि नष्ट केल्याचे सोंग करतात. लोकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ सुरू आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांचे कारण नेहमीचेच आहे. हे कारण चुकीचे आहे. कार्बाईडने पिकविलेल्या आंब्याची बाजारात विक्री होते. पण कारवाई शून्य आहे. कारवाई केलेल्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये धाक निर्माण होईल. - गजानन पांडे, विदर्भ प्रांत अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत.