शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

बापरे, झाडावर माेठ्या संख्येने हे किटक आले कुठून?

By निशांत वानखेडे | Published: October 12, 2023 7:10 PM

डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे किटक शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी ताे ‘स्टींग बग’ असल्याचे स्पष्ट  केले.

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून काही झाडांवर लाखाेंच्या संख्येने किटक दिसून येत आहेत. अगदी लाखाेंच्या समुहाने ते झाडाच्या खाेडाला चिकटून आहेत. किटकांच्या जवळ गेल्यावर घाण दुर्गंधीही येते व स्पर्श केल्यास हाताला लाल रंग लागताे. मानवासाठी व झाडांसाठी हानीकारक तर नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगेजवळील बिहाडीच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील वर्गाला लागून असलेल्या टिपरींच्या झाडावर गेल्या अनेक दिवसापासून ही किटके मुळापासून तर शेंड्यापर्यंत असंख्य प्रमाणात असल्याची माहिती स्थानिक पर्यावरण प्रेमी प्रवीण कडू यांनी दिली आहे. चार-पाच दिवसापासून कडक ऊन तापायला लागल्यानंतर ही किटके झाडाच्या फांद्यांवरून वर्गामध्ये शिरत आहेत. यांना असह्य असा उग्र वास येताे. हातात धरल्यास हात लाल होतो आणि रंग सहजासहजी जात नाही. हा कीटक एका शिक्षकाच्या मानेला चावल्यानंतर दोन दिवसांपासून इंजेक्शन टाेचल्यासारख्या वेदना होत असल्याची माहिती त्यांनी दिली. शाळेतील बालकांच्या  दृष्टीनेही धाेकादायक असल्याने लाेकांमध्ये भीती आहे. नागपुरातही काही झाडांवर हे किटक दिसून येत आहेत. तज्ज्ञांच्या मते हवामानात बदल झाल्याने त्यांचा प्रदुर्भाव वाढला आहे.

हा ‘स्टींग बग’, धाेकादायक नाहीडाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे किटक शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी ताे ‘स्टींग बग’ असल्याचे स्पष्ट  केले. त्यांच्या ओटीपोटातील ग्रंथीमधून स्कंक, सिलॅन्ट्राे आणि अमोनियाचे मिश्रण असलेला तीव्र गंध साेडतात. हा किटक चावल्याने हलक्या वेदना हाेतात. एखाद्या झाडाजवळ थंडावा असेल व झाडाचा गंध त्यांना आवडला तर ते माेठ्या संख्येने जमा हाेतात. मात्र हा किटक मानवासाठी किंवा झाडांसाठीही हानीकारक किंवा धाेकादायक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

क्लाेराेपायरीफासची पावडर फवारल्यास मरतातबाजारात ‘क्लाेराेपायरीफास’ची पावडर किंवा द्रावण या किटकांवर फवारल्यास त्यांचा नायनाट हाेता असल्याचे डाॅ. दवणे यांनी स्पष्ट केले. २० मि.ली. द्रव १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास स्टींग बग नाहीशे हाेतात. मात्र फवारणी करताना डाेळ्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. किटक चावल्याने वेदना अधिक हाेत असतील तर डाॅक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर