नागपूर - वैशाख पौर्णिमेला महाकारु णीक तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. याच दिवशी त्यांना महाबोधी ज्ञान प्राप्ती झाली तर याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. म्हणूनच हे साºया जगासाठी बुद्धपर्व आहे. हे बुद्धपर्व सोमवारी नागपुरातील सर्वच बुद्ध विहारांमध्ये पंचशील ध्वजारोहणाने, बुद्धवंदनेच्या ग्रहणातून, रॅली काढून व सामूहिक प्रवचनांच्या आयोजनातून साजरे झाले. पहाटेपासून पवित्र दीक्षाभूमीवर उपासक-उपासिकांनी ‘ बुद्धम् सरणंम् गच्छामी’ या त्रिशरण आणि पंचशीलेच्या जयघोषात शुद्ध आचरण आणि सत्य बोलण्याचा संकल्प केला. शहरात ठिकठिकाणी व विहारांमध्ये धम्मप्रसाद म्हणून खीर वाटपाचा कार्यक्र म झाला. .
सोमवारी पहाटे पासूनच पांढºया शुभ्र कपड्यांमध्ये, पंचशिलेचा ध्वज हातात घेत बुद्धाचा उपासक आणि बाबासाहेबांचा अनुयायी दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी कधी मिरवणुकीने तर कधी जत्थ्याजत्थ्याने येत होता. पांढºया पोशाखातील निळ्या पाखरांच्या थव्यांनी दीक्षाभूमी गजबजून गेली. येथे येणारा प्रत्येक उपासक तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्तुपातील पवित्र अस्थि कलाशाला वंदन करून निघत होता. -डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी
डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने दीक्षाभूमीवरील तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करण्यात आले. त्यानंतर दीक्षाभूमीवरील पवित्र स्तुपात डॉ. आंबेडकर यांच्या अस्थीला पुष्प अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. याप्रसंगी समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. कमलताई गवई, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, भन्ते नागदीपांकर, डॉ. डी. जी. दाभाडे उपस्थित होते.