सामान्य प्रशासन विभागाच्या पत्राने गोंधळनागपूर : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर यांनी निवडणुकीच्या आचारसंहिता संदर्भातील पत्र बुधवारी सर्व सभापतींना पाठविले. परंतु या पत्रातून कुठल्या निवडणुकीची आचारसंहिता आहे, केव्हापासून आचारसंहिता लागली आहे. यासंदर्भात नेमकेपणे स्पष्ट केले नाही. तसेच या पत्रात त्यांनी सभापतींना त्यांची वाहने कार्यालय ते निवासस्थानापर्यंत वापरण्याची परवानगी दिली आहे. परंतु सभापतीकडे असलेल्या वाहन चालकांना त्यांची वाहने लॉगबुकसह सामान्य प्रशासनाच्या आस्थापना विभागाकडे जमा करण्याच्या सूचना केल्या आहेत. एकीकडे वाहने वापरण्याची परवानगी द्यायची आणि दुसरीकडे चालकाला वाहन जप्त करण्याच्या सूचना द्यायचा. या प्रकारांवर सभापतींनी आक्षेप घेतला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी आचारसंहितेचे पत्र देतांना इतका निष्काळजीपणा कसा काय करू शकतात, असा सवालही त्यांनी केला आहे. या पत्रामध्ये ‘राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र मुंबई यांनी दिनांक डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ निवडणुकीची घोषणा केलेली असून त्याच वेळी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. असा वाक्यप्रयोग केला आहे. यात कुठल्याही निवडणुकीचा उल्लेख नाही, आचारसंहिता कधी लागली याचा उल्लेख नाही, आम्ही काय समजावे, असा प्रश्न सभापतींनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)
आचारसंहिता नेमकी कुठल्या निवडणुकीची?
By admin | Published: October 20, 2016 3:10 AM