लोकसभेचे कोणते मतदारसंघ मित्रपक्षासाठी सोडायचे ? काँग्रेस नेते २ व ३ जून रोजी घेणार आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2023 08:00 AM2023-05-30T08:00:00+5:302023-05-30T08:00:06+5:30

Nagpur News लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. यासाठी राज्यातील ४२ मतदारसंघ निवडण्यात आले असून येत्या २ व ३ रोजी मुंबईतील टिळक भवनात या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.

Which Lok Sabha constituencies should be left for allies? Congress leaders will review on June 2 and 3 | लोकसभेचे कोणते मतदारसंघ मित्रपक्षासाठी सोडायचे ? काँग्रेस नेते २ व ३ जून रोजी घेणार आढावा

लोकसभेचे कोणते मतदारसंघ मित्रपक्षासाठी सोडायचे ? काँग्रेस नेते २ व ३ जून रोजी घेणार आढावा

googlenewsNext

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. यासाठी राज्यातील ४२ मतदारसंघ निवडण्यात आले असून येत्या २ व ३ रोजी मुंबईतील टिळक भवनात या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. संबंधित मतदारसंघात काँग्रेसची स्वत:ची ताकद किती आहे, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे राखायचा की, मित्रपक्षांसाठी सोडायचा, याबाबत स्थानिक नेत्यांची मते जाणून घेतली जाणार असून या आधारावरच काँग्रेस जागावाटपाची रणनीती आखणार आहे.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण हे तीन माजी मुख्यमंत्री या बैठकांना उपस्थित राहतील. २ जून रोजी विदर्भातील दहाही मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. दुपारी १:३० वाजता बुलढाणा मतदारसंघापासून विदर्भाची सुरुवात होईल. यानंतर अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, भंडारा गोंदिया, वर्धा, नागपूर व रामटेक मतदारसंघांवर चर्चा होईल. या बैठकांना मतदारसंघातील माजी मंत्री, खासदार, आमदार, प्रमुख नेते, जिल्ह्याचे प्रभारी, सहप्रभारी, २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पराभूत झालेले उमेदवार, जिल्ह्यातील विविध आघाड्यांचे अध्यक्ष व विभागांचे अध्यक्ष यांना उपस्थित राहण्याच्या सूचना प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आल्या आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात चंद्रपूरची एकमेव जागाच काँग्रेसला जिंकता आली. ही परिस्थिती सुधारण्यासाठी नेत्यांचाही कस लागणार आहे.

Web Title: Which Lok Sabha constituencies should be left for allies? Congress leaders will review on June 2 and 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.