लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आई चिऊ ताईचा घास भरवित असताना एका सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा फ्लॅटच्या गॅलरीतून पडून करुण अंत झाला. दवलामेटीच्या हिलॅटॉप कॉलनीत शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वेद सुरेश सलामे असे या चिमुकल्याचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार दवलामेटी हिलटॉप कॉलनी येथील रहिवासी सुरेश सलामे हे मेघालय येथे बीएसएफ जवान म्हणून कर्तव्यावर आहे. त्यांची पत्नी मेघा चार वषार्ची मुलगी व सव्वा वषार्चा मुलगा वेद याला घेऊन फ्लॅटवर राहते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास चौथ्या मजल्यावरील गॅलरीत मेघा या लहानग्या वेदला जेवन भरवित होत्या. त्यांनी मुलाला एका स्टूलवर बसविले होते. मुलाचा अचानक तोल गेल्याने तौ चौथ्या माळ्यावरुन खाली पडला. हे दृश्य पाहताच मेघा या किंचाळल्या. लागलीच शेजारी तिथे जमा झाले. मुलाला लागलीच नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्याचात जीव असल्याने डॉक्टरानी त्याला आयसीयूमध्ये नेले पण अर्ध्या तासातच त्याने प्राण सोडला. धंतोली पोलिसांनी वाडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. वेदचे वडील सुरेश यांनाही दु:खद घटनेची माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.
गॅलरीत बसवून जेवू घालताना गेला तोल, अन् घात झाला..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 5:26 PM
आई चिऊ ताईचा घास भरवित असताना एका सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा फ्लॅटच्या गॅलरीतून पडून करुण अंत झाला. दवलामेटीच्या हिलॅटॉप कॉलनीत शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वेद सुरेश सलामे असे या चिमुकल्याचे नाव आहे.
ठळक मुद्देचौथ्या माळ्यावरून खाली पडला