लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोषण आहाराच्या रूपात जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडी दिली जात होती. मात्र, त्यासाठी मुख्याध्यापकांना निधीच न मिळाल्याने ३ आॅक्टोबरपासून विद्यार्थ्यांना माध्यान्य भोजनात केवळ पांढरा भात देण्यात येत आहे.शाळांमध्ये वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांकरिता सुरू असलेल्या माध्यान्ह भोजनाकरिता आवश्यक धान्यादी माल व तेल, मीठ, मसाले मागील दोन महिन्यापासून शासनाकडून पुरविल्या जात नाही. मुख्याध्यापकांनी हा सर्व माल खरेदी करावा अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या होत्या. त्याकरिता कुठलाही निधी उपलब्ध करून दिल्या गेले नाही. मागील दोन महिने मुख्याध्यापकांनी जो माल खरेदी केला त्याचे अनुदानसुद्धा मिळाले नाही.याविरोधात सर्व शिक्षक संघटनानी एकत्र येऊन नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून आंदोलन उभारले व ३ आॅक्टोबरपासून धान्यादी मालाची खरेदी न करता उपलब्ध धान्य शिजवून देण्याचे ठरवण्यात आले. बुधवारीही बहुसंख्य शाळांमध्ये धान्यादी माल व तेल मिठाचा साठा संपल्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पांढरा भातच दिल्या गेला.परंतु प्रशासनाकडून मात्र या बाबीची कोणतीही दाखल आतापर्यंत घेण्यात आली नाही.आॅनलाईन माहिती भरण्यासही शाळांचा नकार२ आॅक्टोबरपासून शिक्षक समन्वय समितीने सुरू केलेले आॅनलाईन कामावरील बहिष्कार आंदोलन जोरात सुरू आहे. मंगळवारी शालेय पोषण आहाराबाबतची आॅनलाईन माहिती जिल्ह्यातील १५८० शाळांपैकी केवळ ३२९ शाळांनी भरली.दिवाळीच्या आत निधी मुख्याध्यापकांच्या खात्यातशालेय पोषण आहार शासनाची योजना आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हा रक्षणकर्ता आहे. त्यामुळे विद्यार्थी हितार्थ असा निर्णय मुख्याध्यापकांनी घेऊ नये. मुख्याध्यापकांचा धान्यादी वस्तूंवर झालेला खर्च हा दिवाळीच्या आत देण्यात येईल.- दीपेंद्र लोखंडे,शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प.
पोषण आहारात पांढरा भात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 1:32 AM
पोषण आहाराच्या रूपात जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडी दिली जात होती. मात्र, त्यासाठी मुख्याध्यापकांना निधीच न मिळाल्याने ३ आॅक्टोबरपासून विद्यार्थ्यांना माध्यान्य भोजनात केवळ पांढरा भात देण्यात येत आहे.
ठळक मुद्देनिधीअभावी मुख्याध्यापकांनी घेतला निर्णय : विभागाकडून दखल नाही