जीआरपी’त खळबळ : नाशिकच्या लॉजमध्ये पकडल्यानागपूर : कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी गेलेल्या नागपुरातील तीन महिला पोलिसांना नाशिकच्या एका लॉजमध्ये ‘वेगळीच ड्युटी’ करताना नाशिक पोलिसांनी पकडल्याची विश्वसनीय माहिती आहे. मागील चार दिवसांपूूर्वी घडलेल्या या घटनेबाबत लोहमार्ग पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. याबाबत अधिकारी काहीही बोलण्यास तयार नसून चार दिवसांपासून मात्र लोहमार्ग पोलिसात हा चर्चेचा विषय ठरला आहे.नाशिक येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात कुठलीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी लोहमार्ग पोलिसांचा तगडा बंदोबस्त नाशिकमध्ये लावण्यात आला आहे. त्यासाठी नागपूर, इतवारी, गोंदिया, वर्धा येथील जवळपास ४० महिला पोलीस बंदोबस्तासाठी पाठविण्यात आल्या. परंतु येथे बंदोबस्ताची ड्युटी करीत असताना यातील ३ महिला पोलिसांना २४ आॅगस्टला नाशिक शहर पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका लॉजमध्ये ‘वेगळ्याच’ स्थितीत पकडले. पोलीस असल्यामुळे गयावया करून या महिला पोलिसांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. परंतु ही घटना लोहमार्ग पोलिसात वाऱ्यासारखी पसरली. मागील चार दिवसांपासून या घटनेची जोरदार चर्चा लोहमार्ग पोलिसात सुरू आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसांच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलण्याचे टाळले. (प्रतिनिधी)
‘त्या’ महिला पोलीस कोण ?
By admin | Published: August 29, 2015 3:11 AM