लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संस्कार भारतीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर शहरातील तीन भागात आयोजित ‘कृष्णरूप सज्जा’ या स्पर्धेत एकसाथ यशोदा, राधा आणि श्रीकृष्णाच्या वेशभूषेत चिमुकले सहभागी झाले होते.ही स्पर्धा सावरकरनगर येथील वीर सावरकर सभागृह, जरीपटका येथील दयानंद आर्य कन्या महाविद्यालय आणि बेसा येथील साई मंदिरात घेण्यात आली. स्पर्धेत एक ते आठ वयोगटातील तब्बल तीनशे चिमुकले सहभागी झाले. वीर सावरकरनगर येथील स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब नवरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वर्षा चांदे उपस्थित होत्या. समन्वयन नेहा मुंजे, प्रसाद पोफळी यांनी केले. जरीपटका येथील स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी घनश्याम कुकरेजा होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद लालवानी व चंद्रकांत घरोटे उपस्थित होते. राधा कावडे व दीपाली हरदास यांनी परीक्षण केले. बेसा येथील स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी रेखा ढोरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदरे व नरेश भोयर उपस्थित होते. ज्युली भरबट व सीमा सायरे यांनी परीक्षण केले. सावरकरनगर येथील मुख्य कार्यक्रमात स्वाती भालेराव व त्यांच्या नृत्य चमूने ध्येयगीतावर नृत्य सादर केले. अमर कुलकर्णी यांनी कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. त्यानंतर सुमेधा त्रिफळे, प्रत्युष कुलकर्णी, अर्णव देशपांडे व सोहम रानडे या बाल कलाकारांनी श्वेता गर्गे यांच्या नाट्यछटेचे सादरीकरण केले. या स्पर्धेत सानिका करमाळेकर, दिविजा घरोटे, अरुण बुधोलिया, अदिती वाघ, अदिती मोवाडे, आरोही देशपांडे, कार्तिक ठोंबरे, प्रत्युष कुलकर्णी, श्रीपाद टोकरे यांना पुरस्कृत करण्यात आले. संचालन नंदिनी देशमुख यांनी केले
कुणी बनल्या राधा तर कुणी बनले कान्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 8:01 PM
संस्कार भारतीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर शहरातील तीन भागात आयोजित ‘कृष्णरूप सज्जा’ या स्पर्धेत एकसाथ यशोदा, राधा आणि श्रीकृष्णाच्या वेशभूषेत चिमुकले सहभागी झाले होते.
ठळक मुद्देकृष्णरंगी रंगले ३०० बालगोपालसंस्कार भारतीच्या ‘कृष्णरूप सज्जा’मध्ये सहभागी झाले चिमुकले