शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
2
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
3
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान
4
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
6
सारंगीवादक पंडित राम नारायण यांचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
7
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
8
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
9
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
10
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
11
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
12
मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर कमबॅक, लवकरच 'या' मालिकेत दिसणार; प्रोमो रिलीज
13
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
14
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?
15
संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
16
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!
17
दोन वर्षांच्या बालिकेची अत्याचार करून हत्या; विकृत सावत्र बापाचे निर्घृण कृत्य
18
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
19
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
20
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली

धूम स्टाईलला ब्रेक कुणाचा?

By admin | Published: January 13, 2016 3:27 AM

अल्पवयीन मुले व मुली धूम स्टाईलने मोटरसायकली चालवित आहेत. एका फौजदारी प्रकरणावरील सुनावणीदरम्यान ...

हायकोर्टाची दखल : वाहतूक नियमांचे पालन होत नाहीनागपूर : अल्पवयीन मुले व मुली धूम स्टाईलने मोटरसायकली चालवित आहेत. एका फौजदारी प्रकरणावरील सुनावणीदरम्यान सदर मुद्दा पुढे आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांनी मंगळवारी या विषयावर जनहित याचिका नोंदविण्याचे निर्देश प्रबंधक कार्यालयाला दिलेत. तसेच, अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली.मोटरसायकल चालविताना एका अल्पवयीन मुलाच्या हातून अपघात झाला होता. यामुळे अंबाझरी पोलिसांनी संबंधित मुलाविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे. अल्पवयीन मुलाविरुद्ध एफआयआर नोंदविता येत नाही असा दावा करून उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली होती. एफआयआर रद्द करण्याची विनंती याचिकेत होती. न्यायालयाने विनंती मान्य करण्यास नकार दिला. यामुळे याचिका मागे घेण्यात आली. परंतु, न्यायालयाने गांभीर्य लक्षात घेता हा विषय जनहित याचिका म्हणून जिवंत ठेवला. सध्याची अल्पवयीन मुले शैक्षणिक व अन्य उपक्रमांमुळे अत्यंत व्यस्त असतात. शाळा संपल्यानंतर शिकवणी वर्ग, खेळाचे प्रशिक्षण इत्यादीसाठी त्यांना सतत धावपळ करावी लागते. यामुळे आजकाल अल्पवयीन मुलेही कार व मोटरसायकलींचा उपयोग करतात. अपघाताचा धोका नागपूर : याविषयी काही नियम आहेत पण, त्याचे पालन होत नाही. अल्पवयीन मुले शक्तिशाली मोटरसायकली धूम स्टाईलने पळवितात. दरम्यान, अचानक काही परिस्थिती उद्भवल्यास त्यांना मोटरसायकल नियंत्रित करता येत नाही. यामुळे गंभीर अपघात होतात. अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध सज्ञान आरोपीप्रमाणे खटला दाखल करता येत नाही. यासंदर्भात कडक उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. (प्रतिनिधी)