लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :रामटेक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुतीचा उमेदवार निवडणून येणार याची उत्सुकता लागली आहे. दोन्ही बाजुने विजयाचे दावे केले जात आहे. कुठे कमी, कुठे अधिक मतदान झाल्याच्या नोंदी पुढे येऊ लागल्या आहेत. प्रत्येक उमेदवार या मतदानाच्या टक्केवारीवरून आपले अंदाज बांधू लागला आहे. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांच्या सर्कलमध्ये कुणाला लीड मिळणार यावरून दावे-प्रतिदावे केले जात असले तरी ४ जूनला चित्र स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालावर जिल्हा परिषदेतील राजकीय घडामोडी ठरणार आहेत. काँग्रेसला विजय मिळाला तर जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाला बळ मिळणार आहे. शिवसेनेचा विजय झाल्यास पदाधिकाऱ्यांना पुन्हा संघर्षासाठी तयार राहावे लागणार आहे. सत्ता पक्षातील सदस्यांना गळाला लावण्याच्या विरोधकांच्या हालचाली सुरू होतील. न निवडणुकीपूर्वीच माजी उपाध्यक्ष व एका सदस्याने भाजपात प्रवेश केला.
मतदानानंतर शिवसेना (शिंदे) आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर्कल निहाय मतदानाची टक्केवारी काढून निवडणुकीच्या कौलाचे अंदाज बांधले जात आहे. परंतु मतमोजणीनंतरच चित्र स्पष्ट होईल.