शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

कुणी राेखली कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्त पदांची भरती?

By निशांत वानखेडे | Published: August 08, 2024 6:20 PM

परिपत्रक निघाले, कंपनीही ठरली, पण परीक्षाच नाही : ४२४ पदांच्या भरतीची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

नागपूर : बेराेजगारीच्या भीषण प्रश्नामुळे नाेकऱ्यांसाठी जीवाचा आटापीटा सहन करणाऱ्या तरुणांना सरकारी भरतीबाबत शासन, प्रशासन स्तरावर सुरू असलेल्या टाळाटाळपणामुळे मनस्ताप सहन करावा लागताे आहे. याचे आणखी एक गंभीर प्रकरण कनिष्ठ लेखापाल संवर्गातील भरतीच्या रुपाने समाेर येत आहे. या संवर्गातील ४२४ पदाच्या भरतीचे परिपत्रक काढून वर्ष लाेटले, पण पुढची काेणतीच प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे या पदासाठी दिवसरात्र करणाऱ्या राज्यातील हजाराे तरुणांची निराशा झाली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील रिक्त पदांची भरती करण्याच्या उद्देशाने लेखा व काेषागार संचालनालयातील कनिष्ठ लेखापाल संवर्गातील पदांच्या भरतीसाठी राज्याच्या वित्त विभागातर्फे ३१ जुलै २०२३ राेजी परिपत्रक काढण्यात आले हाेते. ४२४ पदांसाठी एमपीएससीद्वारे भरती करण्याचे निश्चित झाले. ऑनलाईन परीक्षेसाठी टीसीएस-आयओएन कंपनीची नियुक्त करण्यात आली. एवढेच नाही तर प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन परीक्षा घेणे, जानेवारी २०२४ पर्यंत प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत हरकती मागविणे, फेब्रुवारी २०२४ पर्यंत निकाल घाेषित करणे व कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीची कारवाई करण्यापर्यंतचा कार्यक्रम ठरविण्यात आला. तारीखनिहाय कार्यक्रम निर्धारित करूनही पुढे काहीच झाले नाही. परीक्षा झाली नाही आणि काहीच झाले नाही. भरती हाेईल म्हणून जीवाचे रान करून अभ्यास करणाऱ्या तरुणांची यामुळे घाेर निराशा झाली आहे.

कंपनीशी करार न झाल्याने रखडली भरतीदरम्यान परीक्षेबाबत तरुणांकडून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर वित्त विभागातर्फे २७ मे २०२४ राेजी आणखी एक परिपत्रक काढून रखडलेल्या कनिष्ठ लेखापाल पदाच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले हाेते. त्यावर लेखा व काेषागार संचालनालयाने तांत्रिक कारणाने भरती रखडल्याचे कारण देत टीसीएस कंपनीकडे पाठपुरावा सुरू असल्याचे नमूद केले. मात्र कंपनीसाेबत सामंजस्य कराराच्या अनुषंगाने कारवाई न झाल्याने भरतीची जाहीरात कधी प्रसिद्ध केली जाईल, याबाबत माहिती उपलब्ध करून देता येणार नसल्याचे नमूद केले.

विभाग म्हणते माहिती नाहीयाबाबत ‘लाेकमत’ने नागपूर येथील काेषागार विभागाच्या कार्यालयात संपर्क केला असता शासकीय प्रक्रिया कधी पूर्ण हाेईल सांगता येत नाही, आम्हाला या भरती प्रक्रियेबाबत काहीही माहिती व कल्पनाही नाही, असे उत्तर मिळाले.

विभागनिहाय जागानागपूर विभाग - ५८काेकण विभाग - १७८पुणे विभाग - ६६नाशिक विभाग - ३९छत्रपती संभाजीनगर - ३६अमरावती विभाग - ४७

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीnagpurनागपूर