दयानंद पाईकराव
नागपूर : नागपूर शहरात ट्रीपल सीट वाहन चालविणा-यांची संख्या खूप मोठी आहे. एका दुचाकीवर दोन व्यक्तींनी प्रवास करावा, असा वाहतुकीचा नियम आहे. परंतु अनेकजण हा नियम पायदळी तुडवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. ट्रीपल सीट वाहन चालविल्यामुळे दुचाकीवर योग्य नियंत्रण राहत नाही. परिणामी, अपघाताची दाट शक्यता निर्माण होते. त्यामुळे अशा वाहनचालकांवर वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात येते. तरीसुद्धा अनेकजण ट्रीपल सीट वाहन चालविताना दिसतात. जानेवारी ते जुलै २०२१ या आठ महिन्यांच्या काळात वाहतूक विभागाने ट्रीपल सीट चालविणाऱ्या तब्बल ९९१५ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंडापोटी १९ लाख ८३ हजार रुपये वसूल केल्याची धक्कादायक माहिती आहे.
वाहतूक शाखेची कारवाई
महिना/ चालान दंड
१) जानेवारी २१५० ४३००००
२) फेब्रुवारी २०४५ ४०९०००
३) मार्च १४८१ २९६२००
४) एप्रिल ७०४ १४०८००
५) मे ३८४ ७६८००
६) जून ७९३ १५८६००
७) जुलै १२७४ २५४८००
८) ऑगस्ट १०८४ २१६८००
दुचाकी चालकांनो हे नियम पाळा
-हेल्मेटचा वापर करा
-वाहनाचे कागदपत्र सोबत बाळगा
-वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडेच उभे करा
-झिकझॅक पद्धतीने वाहन चालवू नका
-वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा
वाहतूक पोलिसांकडून आकारण्यात येणारा दंड
सिग्नल तोडणे : १२०० रुपये
वेगात वाहन चालविणे : १ हजार रुपये
नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे : २०० रुपये
राँग साइड वाहन चालविणे : १ हजार रुपये
फॅन्सी नंबर प्लेट : २०० रुपये
विनाहेल्मेट वाहन चालविणे : ५०० रुपये
वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे : १२०० रुपये
......