शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

रुग्णालयातील आगीचा धडा कोण घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:16 AM

नागपूर : अमरावती येथील जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात २२ एप्रिल २०१९ रोजी अचानक शॉर्ट सर्किटमुळे ...

नागपूर : अमरावती येथील जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात २२ एप्रिल २०१९ रोजी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. परंतु त्यावेळी कर्तव्यावर असलेले डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी हे जागे असल्याने २२ बालकांचे प्राण वाचविण्यास त्यांना यश आले. अशीच घटना ३१ ऑगस्ट २०१९ रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) घडली. ‘प्री टर्म बेबी युनिट’ला (पीबीयू) लागलेल्या आगीत एका परिचारिकेच्या धाडसाने नऊ बालकांचे प्राण वाचले. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या दोन्ही घटनेचा शासनासह भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयानेही धडा घेतला नसल्याचे दिसून येते.

मेयोचा त्या घटनेत ‘पीबीयू’कक्षात तिघे बालके ऑक्सिजनवर, दोघे ‘वॉर्मर’वर तर चार बालके इनक्युबेटरवर होती. रात्री सर्वच गाढ झोपेत असताना पहाटे २.४५ वाजता स्टाफ नर्स सविता ईखार आपल्या कामात व्यस्त होत्या. त्याचवेळी अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग आगली. ईखार यांच्या लक्षात ही बाब येतात त्यांनी याची माहिती सुरक्षा रक्षकांना दिली. परंतु त्यांना यायला व मदत पोहचण्यास उशीर होणार असल्याने जीवाची बाजी लावत दोन हातात दोन बालके घेत सर्वांना सुरक्षितस्थळी हलविले. त्यापूर्वी आग पसरू नये म्हणून तातडीने ऑक्सिजन आणि वॉर्मरही बंद केले. या धाडसाने नऊ बालकांचे प्राण वाचले. विशेष म्हणजे, अशीच घटना १९९८ मध्ये घडली होती. बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागाला ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागली होती. त्यावेळी विद्या चंद्रशेखर कावळे या परिचारिकेने कक्षातील सात बालकांना आपल्या पदरात घेऊन सुरक्षितस्थळ गाठले होते.

- नवजात शिशू अतिदक्षता विभागाला लागली होती आग

अमरावती येथील जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात ‘इन बॉर्न’ व ‘आऊट बॉर्न’ कक्षात २२ बालके उपचाराला होती. सकाळी १०.३० वाजताचा सुमारास या कक्षाच्या शेजारी असलेल्या विद्युत नियंत्रण कक्षातून अचानक स्फोट झाला. धूराचे लोट बाहेर येऊ लागले. यावेळी विभागातील इन बॉर्न युनिटमध्ये ९ मुले, २ मुली व आऊट बॉर्न युनिटमध्ये ७ मुले व १ मुली असे एकूण २२ शिशू होते. स्फोट, धूराचे लोट व उग्र गंध यामुळे अतिदक्षता विभागात एकच खळबळ उडाली. विभागात सर्वत्र काळोख पसरला होता. अंधारात काहीच दिसत नसतानादेखील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी वर्षा पागोटे, ललिता अटाळकर, नलिनी काळसर्पे यांच्यासह सहा नर्सेस व पाच महिला अटेंडंट यांनी तातडीने बालकांना दुसऱ्या कक्षात हलवून बालकांचे प्राण वाचविले.

- मेडिकलमध्ये नवजात बाळ जळाले होते

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ‘एनआयसीयू’ कक्षात ‘वॉर्मर’मध्ये ठेवलेल्या २७ दिवसाच्या बाळाचा जळून मृत्यू झाला होता. २००९ मध्ये या प्रकरणाचीही चौकशीही झाली. परंतु गंभीरता कुणीच घेतली नाही.

- चिमुकले जळण्याच्या घटनेतून खासगी हॉस्पिटलेही सुटली नाहीत

‘एनआयसीयू’मध्ये चिमुकले जळण्याच्या घटनेत खासगी रुग्णालये सुटली नाहीत. ८ जुलै २०१९ रोजी नागपूर येथील डॉ. कुश झुनझुनवाला यांच्या खासगी हॉस्पिटलमधील ‘एनआयसीयू’मध्ये भरती असलेला ११ दिवसाच्या बाळाचा ‘फोटो थेरपी’ यंत्रात जळून मृत्यू झाला होता.