शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नागपूर जिल्ह्यात चारा छावण्या का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:59 PM

मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे जनावरांना जगविण्यासाठी सरकारने चारा छावण्या उघडल्या. विदर्भातसुद्धा अशीच अवस्था यावर्षी बघायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात तीन तालुके दुष्काळाच्या यादीत आहेत. तालुक्यात जनावरांना चारा उपलब्ध झालेला नाही. पशुपालक चाऱ्यासाठी भटकंती करीत आहे. चारा नसल्याने जनावरांना तणस खायला घालत आहेत. काटोल, कळमेश्वर, नरखेड तालुक्यांमध्ये चाऱ्याची भीषण टंचाई आहे. पण पशुसंवर्धन विभाग चाराटंचाई नसल्याचा दावा करीत आहे. पशुपालकांची जनावरं जगविण्यासाठी होत असलेली होरपळ लक्षात घेता जिल्ह्यात चारा छावण्या का नाहीत, असा सवाल पशुपालकांनी केला आहे.

ठळक मुद्देतीन तालुके दुष्काळग्रस्त : पशुपालकांची चाऱ्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे जनावरांना जगविण्यासाठी सरकारने चारा छावण्या उघडल्या. विदर्भातसुद्धा अशीच अवस्था यावर्षी बघायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात तीन तालुके दुष्काळाच्या यादीत आहेत. तालुक्यात जनावरांना चारा उपलब्ध झालेला नाही. पशुपालक चाऱ्यासाठी भटकंती करीत आहे. चारा नसल्याने जनावरांना तणस खायला घालत आहेत. काटोल, कळमेश्वर, नरखेड तालुक्यांमध्ये चाऱ्याची भीषण टंचाई आहे. पण पशुसंवर्धन विभाग चाराटंचाई नसल्याचा दावा करीत आहे. पशुपालकांची जनावरं जगविण्यासाठी होत असलेली होरपळ लक्षात घेता जिल्ह्यात चारा छावण्या का नाहीत, असा सवाल पशुपालकांनी केला आहे.काटोल, कळमेश्वर, नरखेड या तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. जमिनीतील पाण्याची पातळी हजार फुटावर गेली आहे. यंदा पशुपालकांकडे चाऱ्याचे उत्पादन घेणे शक्य झाले नाही. तालुक्यात जनावरांसाठी चाराच उपलब्ध नाही. त्यामुळे जनावरांना तणस खाऊ घालावे लागत आहे. काटोल तालुक्यातील काही पशुपालकांशी चर्चा केली असता पहिल्यांदा अशी भीषण अवस्था निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यावर्षी चारा छावण्यांची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.येनवा येथील पशुपालक नितीन आगरकर म्हणाले की, विहिरींना पाणी नसल्यामुळे एका एकरात तयार केलेला चाऱ्याचा प्लॉट खराब झाला आहे. त्यामुळे जबलपूर येथून चण्याचे कुटार आणावे लागत आहे. आज दुधाला मिळणारे दर आणि चाऱ्याचा वाढता खर्च परवडणारा राहिलेला नाही. पण दुष्काळात जनावरं जगवायची आहेत. त्यासाठी खटपट सुरू आहे. कोंढाळी येथील पशुपालक पुरुषोत्तम हगवते म्हणाले की, यंदा दुष्काळामुळे गहू पेरला नाही. त्यामुळे गव्हांडा राहिलेला नाही. चारा नसल्याने भंडाºया जिल्ह्यातून तणस बोलाविले आहे. पहिल्यांदा ९ हजार रुपये ट्रॉली तणस घेतले, आता १०,५०० रुपये ट्रॉलीने तणस घ्यावे लागत आहे. जनावरांचे पोट भरण्यासाठी तणस खाऊ घालण्याची वेळ आली आहे. डोरली येथील पशुपालक विलास जीवतोडे म्हणाले की, काटोल तालुक्यातील चारखांब, सोनखांब, ढवळापूर, मेंढेपठार अशा बहुतांश गावांमध्ये प्रचंड चाराटंचाई आहे. यावर्षीसारखी टंचाई पहिल्यांदा अनुभवत आहे. ऐपत असलेल्या पशुपालकांनी तणस आणून सोय केली आहे. पण काही पशुपालकांनी जनावरं विक्रीस काढलेली आहेत.पशुसंवर्धन विभागाने दिलेले वैरण निकामी ठरले आहेपशुसंवर्धन विभागाने वैरणीच्या योजना राबविल्या. पण शेतकऱ्यांपर्यंत उशिरा पोहचल्या. त्यात पाणी नसल्यामुळे वैरण उगवलेच नाही. चाऱ्याची भीषण टंचाई असताना पशुसंवर्धन विभाग कागदावर टंचाईच नसल्याचे दाखवित आहे. पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पं.स. स्तरावर पशुधन अधिकारी असतानाही दुष्काळाचे नियोजन झाले नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात १०० ट्रक तणस जनावरांचे खाद्य म्हणून येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूर