शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

उपराजधानीत लोकसंख्येनुसार १७० वॉर्ड का नाहीत? निवडणुकीसाठी इच्छुकांना पडला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 8:30 AM

Nagpur News वर्ष २०१७ ची निवडणूकही २०११ च्या जनगणनेनुसार झाली होती. वास्तविक मागील दहा वर्षांत नागपूर शहरातील लोकसंख्या ५ लाखांनी वाढली आहे. याचा विचार करता २०२२ मध्ये १७० वॉर्ड असायला हवेत.

ठळक मुद्दे दहा वर्षांत ५ लाख लोकसंख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २०२२ मध्ये होणारी महापालिका निवडणूक वॉर्ड पद्धतीने होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार प्रारूप वॉर्डरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. वर्ष २०१७ ची निवडणूकही २०११ च्या जनगणनेनुसार झाली होती. वास्तविक मागील दहा वर्षांत नागपूर शहरातील लोकसंख्या ५ लाखांनी वाढली आहे. याचा विचार करता २०२२ मध्ये १७० वॉर्ड असायला हवेत. (Why aren't there 170 wards in the capital according to the population?)

२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २२ लाख आहे, तर २०१७ च्या निवडणुकीत शहराची लोकसंख्या २४ लाख, ४७ हजार, ४९४ गृहीत धरून ६५ ते ७० हजार लोकसंख्येचा चार सदस्यीय प्रभागात निर्माण करण्यात आला होता. त्यावेळी प्रथमच हुडकेश्वर, नरसाळा भागाचा समावेश महापालिकेत करण्यात आला.

चारसदस्यीय प्रभागातील लोकसंख्या गृहीत धरता एका वॉर्डाची लोकसंख्या १६ ते १८ होते; परंतु गेल्या पाच वर्षांत लोकसंख्या पुन्हा वाढली. ती आता २७ लाखांवर गेली आहे. त्यानुसार २० वॉर्ड वाढावयास पाहिजेत; अन्यथा वॉर्डाची संख्या १५१ कायम ठेवल्यास प्रत्येक वॉर्ड हा २० ते २२ हजार लोकसंख्येचा राहण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने एकसदस्यीय वॉर्डरचनेनुसार प्रारूप वॉर्डरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. सर्वेक्षणानंतर समिती वॉर्डरचनेचा आराखडा तयार करणार आहे. मात्र, महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्येनुसार १५१ वॉर्डांतील लोकसंख्या निश्चित करणार की, लोकसंख्या वाढल्याने वॉर्डांची संख्या वाढणार याबाबत बोलण्यात मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला. नवीन वॉर्ड रचनेसोबतच आरक्षण सोडत काढली जाईल. मनपात १५१ सदस्य कायम राहिल्यास महिलांसाठी ७६ जागा राखीव राहतील.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका