लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :अवनी किंवा टी-१ नावाच्या वाघिणीच्या मृत्यूवरून देशभरात वादंग सुरू आहे. आठवडभरापासून या वाघिणीला मारताना नियमांचा अवलंब योग्य प्रकारे केला गेला नसल्याचे आरोप होत आहेत. मारण्याची पद्धत चुकीचीच होती. परंतु मागील तीन वर्षात वाघांच्या हल्ल्यात २३ लोकांचे बळी गेलेत. एखादा वाघ १३ लोकांचे बळी घेत असेल, त्याला पकडण्यात यश येत नसेल अशा परिस्थितीत त्याला गोळी झाडून ठार के ले असेल तर या गोष्टीचा एवढा बाऊ कशाला असा सवाल काँगे्रसचे विधीमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टेवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, किशोर गजभिये आदी उपस्थित होते.गेल्या काही वर्षात २६ वाघांचे बळी गेले आहेत. कधी आपसातील झुंज, विजेचा धक्का लागून तर कधी कालव्यात पडल्याने ते मरण पावले. पर्यावरण संतुलनासाठी वाघ वाचला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांचे बळी त्याहून महत्वाचे आहेत. वाघाला ठार केले म्हणून ह्ळहळ व्यक्त करण्याची गरज नाही. जंगललगतच्या ४२ गावातील नागरिक दहशतीत जीवन जगतात. जंगल परिसरातील शेतीचे संरक्षण वन विभागाने केले पाहिजे. वन्य प्रान्यांनी गावाकडे येवू नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सोलर कुंपण उपलब्ध केले पाहिजे. वन्य प्राण्यापासून शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. वाघांना विदर्भातील लोकांनीच पोसायचे का? सिमेंटच्या जंगलातील लोकांना जंगलालगत राहणाऱ्या लोकांच्या समस्या कशा कळतील. एनजीओंना वस्तुस्थिती माहित नाही. आरएसएस आदीवासींना वनवासी म्हणतात. तशातलाच हा प्रकार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.पांढरकवडा भागात दहशत निर्माण करणाऱ्या वाघिणीला काही दिवसापूर्वी वन विभागाच्या पथकाने ठार मारले. या वाघिणीला आधी बेशुद्ध न करता तिला गोळी घालण्यात आली असल्याचा आरोप होत आहे. यावरून राजकीय वातावण तापलेले असतानाच विजय वडेट्टीवार यांनी, आता ही चर्चा खूप झाली, ठार मारण्याचा बाऊ करण्याची गरज नाही अशी भूमिका मांडली.
तुकाराम मुंडे यांना नागपूरला आणाभाजपाचे नेते स्वच्छ कारभाराचा दावा करतात. परंतु नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचार सर्वश्रृत आहे. कराचा बोजा जनतेवर लादला जात आहे. महापालिकेतील भाजपा नेत्यांत अंतर्गत वाद आहेत. शासन निधी वेतनावर खर्च करावा लागत आहे. महापालिकेचा कारभार खरोखरच पारदर्शी व स्वच्छ करायचा असेल तर आयुक्त म्हणून तुकाराम मुुंडे यांना नागपुरात आणा अशी मागणी विजय वडेट्टीवार व अतुल लोंढे यांनी केली.