लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजधानीमध्ये मराठी भाषा भवन उभारण्याची चर्चा सुरू असतानाच उपभाषा भवन उभारण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र राजधानीमध्ये भवनाची गरज असताना उपभवनाचा विषय कसा काय पुढे आला, याबद्दल आश्चर्य व्यक्त करणारे पत्र श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.मराठी भाषा भवनाऐवजी भाषा उपभवन ही संकल्पना समोर आली आहे. याबद्दल जोशी यांनी पत्रातून आश्चर्य व्यक्त केले आहे. उभारले जाणारे उपभाषा भवन महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीच्या ठिकाणी उभारले जाण्याचा निर्णय झाल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबईच्या वेशीबाहेर सिडकोच्या नवी मुंबईतील जागेत हे केंद्र उभारण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतल्याची माहिती पुढे आल्याने या बाबत मराठी भाषा प्रेमींमध्ये संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे. या निर्णयाचे पडसादही उमटले आहेत. त्यामुळे हे केंद्र शहराबाहेर गैरसोईच्या ठिकाणी नेण्याच्या कारणामागील अधिकृत माहिती शासनाने जाहीर करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.श्रीपाद जोशी यांनी यापूर्वीच या संदर्भात संबंधित मंत्री व शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र त्यावर योग्य माहिती मिळण्याऐवजी पत्र आणि निवेदने कार्यवाहीसाठी पाठविली गेल्याचे तांत्रिक उत्तर मिळाल्याने नेमके काय चालले हे कळायला मार्ग नाही. ही बाबही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहे.या भाषा उपकेंद्रांची मागणी कुणी आणि कशा स्वरूपात व केव्हा केली याबद्दलही जोशी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. उपकेंद्रच उभारायचे असल्यास त्यांची गरज राजधानीत नसून ती विभागीय पातळीवर आहे. विभागीय पातळीवर त्यांची स्थापना करून विकेंद्रीत स्वरूपात चालवली जाणार आहेत किंवा स्वरतंत्रपणे याबद्दलही मराठीजनांमध्ये असलेली अनभिज्ञता त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. ना. विनोद तावडे यांनाही या पत्राची प्रत त्यांनी पाठविली आहे.मराठीच्या संवर्धनासाठी मराठी भाषा प्रेमींकडून अभियान सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठी भाषा भवन मुंबईमध्ये उभारले जावे, यासाठी मागील अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. अलीकडेच मुंबईतील आझाद मैदानात धरणेही झाले होते. हा विषय ताजा असतानाच राज्य सरकारने भाषा भवनाऐवजी उपभाषा भवनाचा मुद्दा पुढे आणल्याने मराठीविषयक तज्ज्ञांमध्ये नाराजी आहे.
राजधानीमध्ये भाषा भवनाऐवजी उपभवन कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 8:24 PM
राजधानीमध्ये मराठी भाषा भवन उभारण्याची चर्चा सुरू असतानाच उपभाषा भवन उभारण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र राजधानीमध्ये भवनाची गरज असताना उपभवनाचा विषय कसा काय पुढे आला, याबद्दल आश्चर्य व्यक्त करणारे पत्र श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
ठळक मुद्देश्रीपाद जोशी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : उपभवनांची गरज विभागीय पातळ्यांवरमराठी वाचवा लोकमत अभियान