शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
2
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
3
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
4
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
5
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
6
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
7
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
8
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
9
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली
10
ट्रम्प जिंको अथवा हॅरीस...; अमेरिकेच्या राष्ट्रपतीला किती मिळणार सॅलरी? सोबतच या खास सुख-सुविधाही मिळणार
11
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
12
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
14
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
15
IND vs AUS: डेव्हिड वॉर्नरला पर्याय सापडला! भारताविरूद्ध 'हा' असेल ऑस्ट्रेलियाचा 'ओपनर'
16
Reliance Jio ची ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, कमी पैशात मिळताहेत 'इतक्या' OTT चं सबस्क्रिप्शन 
17
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
19
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
20
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट

भिडे, एकबोटेला अद्याप अटक का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:23 PM

१ जानेवारीला घडलेल्या कोरेगाव-भीमाच्या घटनेला एक महिना लोटूनही या सुनियोजित हल्ल्याचे मुख्य आरोपी असलेल्या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे व त्यांच्या साथीदारांना अद्याप अटक का झाली नाही, असा सवाल समता सैनिक दलाने केला आहे.

ठळक मुद्देसमता सैनिक दलाचा सवाल : सर्वोच्च व उच्च न्यायालयात याचिका दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १ जानेवारीला घडलेल्या कोरेगाव-भीमाच्या घटनेला एक महिना लोटूनही या सुनियोजित हल्ल्याचे मुख्य आरोपी असलेल्या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे व त्यांच्या साथीदारांना अद्याप अटक का झाली नाही, असा सवाल समता सैनिक दलाने केला आहे. सरकारवर आता भरवसा नाही, त्यामुळे आरोपींविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करून या प्रकरणासाठी स्वतंत्र तपास यंत्रणा नेमण्यात यावी यासाठी दलाच्या वतीने सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. स्मिता कांंबळे यांनी पत्रपरिषदेतून दिली.अ‍ॅड. कांबळे म्हणाल्या, या घटनेच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र बंद पुकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटेंना अटक करण्याची व संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, आज या घटनेला एक महिन्याचा कालावधी लोटूनही कुठल्याही प्रकारची चौकशी नेमण्यात आलेली नाही. उलट आंदोलनात सहभागी झालेल्या आंबेडकरी समाजातील निर्दोष युवकांना अटक करून त्यांचे भविष्य नासविण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोपही अ‍ॅड. स्मिता कांबळे यांनी केला. या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यासह केंद्रीय व राज्य अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, प्रधानमंत्री, राज्यपाल यांना निवेदन पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय  न्यायालयातही हे प्रकरण नेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला अमन कांबळे, विश्वास पाटील, राजेश लांजेवार, जितेंद्र घोडेस्वार, घनश्याम फुसे, सुनील जवादे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBhima-koregaonभीमा-कोरेगाव