शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

नागपुरात का तुटेना कोरोनाची साखळी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईसह राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुंबईसह राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. मनपा प्रशासनाचे दावे व प्रत्यक्षातील स्थिती यात मोठी तफावत आहे. राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीतदेखील याच बाबी समोर आल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे करण्यात येत असलेले दुर्लक्ष, मर्यादित आरोग्यसुविधा आणि अत्याधुनिक यंत्रणेचा अभाव ही तर कोरोनावाढीची कारणे आहेतच. नागपुरात कोरोनाची साखळी नेमकी का तुटत नाही यावर टाकलेला हा प्रकाश.

ना ट्रेसिंग, ना त्वरित उपचार

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून मनपा प्रशासनाने काहीच धडा घेतला नाही. कोविड प्रोटोकॉलचे पालन योग्य पद्धतीने झालेच नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग आणि उपचार यावर भर दिला गेला नाही. मुंबईत बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची त्वरित चाचणी होते. नागपुरात मात्र यात हलगर्जीपणा दाखविण्यात आला व त्यामुळे कोरोनाची साखळी आणखी वाढत गेली.

ऑक्टोबर महिन्यापर्यंत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत होते. मात्र त्यानंतर त्याला ब्रेक लागला. फेब्रुवारी महिन्यात बाधितांची संख्या परत वाढायला लागल्यानंतर प्रत्येक रुग्णामागे कमीत कमी १० ते १५ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हायला हवे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचा सांगणे होते. प्रत्यक्षात मनपाने त्याकडे दुर्लक्ष केले. अनेक बाधितांना तर ते ठीक झाल्यानंतर मनपाकडून माहिती विचारण्यासाठी फोन आले. होम आयोसेलेशनमध्ये असलेल्यांवर उपचार कसे सुरू आहेत यासाठी विचारणा करण्यासाठी मनपाकडे आवश्यक यंत्रणा नाही. दररोज सरासरी साडेसहा हजार रुग्ण निघत असताना त्यापैकी १० टक्के रुग्णांशीदेखील संपर्क होत नाही.

वर्षभरानंतर सुविधांची व्यवस्था नाही

योग्य वेळेत बेड न मिळणे, उपचारादरम्यान औषधे व ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटर्स व इतर बाबींसाठी करावी लागणारी प्रतीक्षा यामुळे मृत्यू पडणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. नागपूरला मध्य भारतातील वैद्यकीय हब म्हटले जाते. मात्र मनपाच्या रुग्णालयांत मर्यादित व्यवस्था आहे. एकूण रुग्णांपैकी किती जणांना ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर्सची गरज पडू शकते याचा अभ्यासच झाला नाही. परिणामी वर्षभरानंतरदेखील आवश्यक सुविधा निर्माण होऊ शकल्या नाहीत. वर्षभराचा कालावधी मिळूनदेखील मनपाच्या अखत्यारितील रुग्णालयांमध्ये पाचशेहून अधिक बेड नाहीत. मेडिकल व मेयो इस्पितळांवर मोठा भार येत आहे. तेथे छत्तीसगड, मध्य प्रदेशसह विदर्भातील इतर जिल्ह्यांतील रुग्णदेखील येत आहेत. त्यामुळे बेड मिळणे कठीण झाले आहे. खासगी रुग्णालयात अगोदर पैशांची मागणी केली जाते. गोल्डन पिरेडमध्ये उपचार मिळत नसल्याने मृत्यू पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. नागपूर शहरात दररोज चार हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. मात्र उपलब्ध बेड्सची संख्या ७,८५९ इतकीच आहे. व्हेंटिलेटर्सची सुविधा असलेले बेड्स केवळ ५६० इतके आहेत, तर ४ हजार ७९४ ऑक्सिजन बेड्स आहेत.

मर्यादित मनुष्यबळ, लोकप्रतिनिधींची उदासीनता

रुग्णांची सातत्याने संपर्क ठेवणे आवश्यक असताना मनपाकडून मर्यादित मनुष्यबळाचे कारण देण्यात येत आहे. वैद्यकीय भाग वगळता इतर प्रशासकीय कामांसाठीदेखील लोक उपलब्ध नाहीत. इतर विभागांतील लोक कोरोनासाठी काम करण्यास तयार नाही. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनीदेखील उदासीनता दाखविली.

तंत्रज्ञानाच्या वापराकडे दुर्लक्ष

बृहन्मुंबई महानगरपालिकेने रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी विशेष व्यवस्था उभारली. नागपूर मनपाने कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी हेल्पलाइन सुरू केली. मात्र बरेचदा या हेल्पलािनवर काहीच प्रतिसाद मिळत नाही. शिवाय येथे रुग्णांना योग्य पद्धतीने मार्गदर्शनदेखील होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

समन्वयाचा अभाव

नागपूर हे उपराजधानीचे शहर आहे. मात्र येथे मनपा प्रशासन, रुग्णालय, राज्य शासन यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. मनपा प्रशासनाच्या कारभारावर तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेदेखील ताशेरे ओढले आहेत. एप्रिल महिन्यात ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेकांचा मृत्यू झाला. स्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वपक्षीय समन्वय बैठकांना सुरुवात झाली. मनपा व रुग्णालयांमध्ये समन्वय नसल्याने रुग्णांना फटका बसतो आहे. मनपाने शहरातील कुठल्या रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी किती बेड आहेत हे कळावे यासाठी विशेष संकेतस्थळ सुरू केले. मात्र या संकेतस्थळावरील माहिती व प्रत्यक्षात उपलब्ध असलेले बेड याचा ताळमेळच बसत नाही. संकेतस्थळावर बेड असल्याचे दाखविले जाते व रुग्णालयांत मात्र त्यांची उपलब्धता नसते. यामुळे नाहक रुग्णांची पायपीट होते व वेळेत उपचार मिळू शकत नाही.

एप्रिल महिन्यातील आकडेवारी (नागपूर जिल्हा)

पॉझिटिव्ह - १,७८,१२१

मृत्यू - २,२३०

कोरोनामुक्त - १,३९,१५६

नागपूर शहरातील बेडची स्थिती

बेड्स - संख्या

सर्वसाधारण बेड्स – ३१९

ऑक्सिजन बेड्स – ४,७९४

आयसीयू बेड्स – २,१८६

व्हेंटिलेटर्स - ५६०