शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

भाजपने एकनाथ खडसेंना मुख्यमंत्री का केले नाही?; राष्ट्रवादीचा सवाल

By कमलेश वानखेडे | Published: June 27, 2023 6:13 PM

भाजपचे ओबीसी प्रेम म्हणजे पोलिटिकल नौटंकी

नागपूर : भाजपचे ओबीसी प्रेम हे केवळ पोलिटिकल नौटंकी आहे. राज्यात भाजप-सेना युतीचा सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी ओबीसी नेते असलेले एकनाथ खडसे यांना डावलून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री कसे झाले, कामठीत बावनकुळे यांचे तिकीट का कापण्यात आले, पंकजा मुंडे यांची पक्षात दमकोंडी का सुरू आहे, असे सवाल करीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर उत्तर द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

कुंटे पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने आजवर तीनदा ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद दिले. दोनदा उपमुख्यमंत्रीपद दिले. भाजपने तर शिंदे गटासोबत सत्ता स्थापन करताना उपमुख्यमंत्रीपदही ओबीसी नेत्याला दिले नाही. आजही राष्ट्रवादीचे विदर्भातील ९० टक्के जिल्हाध्यक्ष ओबीसी समाजाचे असल्याचे सांगत भाजपचे किती संघटन मंत्री ओबीसी आहेत, ते जाहीर करण्याचे आव्हान त्यांनी दिले. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत आपला पराभव दिसू लागल्यामुळे भाजपने पक्षात ओबीसी चेहऱ्यांची आयात सुरू केली आहे. त्यांचे ओबीसी प्रेम म्हणजे पोलिटिकल नौटंकी आहे, अशी टीकाही कुंटे पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा २९ जुलै रोजी नागपुरात सत्कार आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी आ. दीनानाथ पडोळे, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड, श्रीकांत शिवरकर, जावेद हबीब, महेंद्र भांगे, श्रीकांत आंबुलकर, नितीन भटारकर आदी उपस्थित होते.

मतविभाजनासाठी बीआरएस महाराष्ट्रात

- राज्यात महाविकास आघाडीला भक्कम बहुमत मिळणार असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. याचा धसका भाजपने घेतला आहे. त्यामुळे गेल्यावेळी जसे मतविभाजनासाठी हैद्राबादवरून एमआयएमला आणण्यात आले होते, त्याच धर्तीवर आता भारत राष्ट्र समिती (बीआरएस) ला आणण्यात आले आहे, असा आरोप कुंटे पाटील यांनी केला. शेतकरी आंदोलनात अपयशी ठरलेल्या नेत्यांना हाताशी धरून बीआरएस डाव खेळू पाहत आहे, पण शेतकरी यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाeknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे