लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे मराठी दिन साजरा करण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे मराठीचाच अनादर करायचा. नुकत्याच कर्जमाफीसाठी अर्ज करणाºया शेतकºयांच्या याद्या मराठीऐवजी इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आल्या. शेतकºयांना या याद्या वाचता येत नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या याद्या इंग्रजीमध्ये देऊन शेतकºयांची थट्टा करण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे, अशी टीका माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.निवडणुकीच्या काळात भाजपाच्या नेत्यांनी सत्तेत येताच कर्जमाफी करू, असे आश्वासन दिले होते. यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात भाजपाला मतदान केले. परंतु सत्तेत येताच निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाचा विसर भाजपाच्या नेत्यांना पडला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सर्वच विरोधी पक्षांनी आंदोलने केली. महाराष्ट्रभर संघर्ष यात्रा काढून सरकारला जागे करण्याचे काम करण्यात आले. यानंतर शेतकºयांनी एकजूट दाखवीत संप पुकारला. देशाच्या इतिहासात शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ होती. संप मोडण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. शेवटी सरकारला झुकावे लागले आणि कर्जमाफीची घोषणा करावी लागली.परंतु कर्जमाफी देण्याची तयारीच सरकारची नव्हती. त्यामुळे जाचक अटी टाकून आॅनलाईनचा घोळ करून ही कर्जमाफी टाळण्याचा प्रयत्न केला. याद्या प्रसिद्ध करून त्याचे चावडी वाचन करून शेतकºयांची इज्जत काढण्यात आली.प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत आपले नाव आहे का, हे पाहण्याची उत्सुकता शेतकºयांमध्ये आहे. परंतु इंग्रजी भाषेतून याद्या असल्यामुळे शेतकºयांचा गोंधळ उडाला आहे. दुसरीकडे मराठीसाठी रस्त्यावर उतरणारी शिवसेनासुद्धा या मुद्यावरून गप्प का, असा सवालही देशमुख यांनी केला आहे.
कर्जमाफीच्या याद्या इंग्रजीमध्ये का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 1:17 AM
एकीकडे मराठी दिन साजरा करण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे मराठीचाच अनादर करायचा. नुकत्याच कर्जमाफीसाठी अर्ज करणाºया शेतकºयांच्या याद्या मराठीऐवजी इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आल्या.
ठळक मुद्देशेतकºयांची थट्टा : अनिल देशमुख यांची टीका