लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांच्याविरुद्ध तक्रार देऊनही पोलीस करावाई करीत नाही. त्यामुळे याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.कुलगुरूंच्या या पत्रप्रंपचामुळे आता गणेशपेठ पोलीस सुनील मिश्रा यांच्यावर कारवाई करतात का याकडे लक्ष लागले आहे. पोलीस मिश्रा यांच्याविरुद्ध कारवाई करीत नाही, असे कुलगुरूंनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन ही संस्था सुनील मिश्रा यांची आहे. या संस्थेमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विद्यापीठाने चौकशी समिती नियुक्ती केली आहे.या संस्थेची चौकशी करण्यासाठी चंद्रिकापुरे समितीच्या सदस्यांसह काही दिवसांपूर्वी गणेशपेठ परिसरातील सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनच्या कार्यालयात गेले होते. यावेळी चौकशी समितीच्या सदस्यांशी सुनील मिश्रा यांनी वाद घातला होता. या प्रकाराच्या विरोधात नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सुनील मिश्राच्या विरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात फौजदारी तक्र ार केली. पोलिसांनी मात्र सुनील मिश्राच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे लागले असे कुलगुरूंनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले आहे.
मिश्राविरुद्ध पोलीस कारवाई का करीत नाही ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 8:59 PM
सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांच्याविरुद्ध तक्रार देऊनही पोलीस करावाई करीत नाही. त्यामुळे याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
ठळक मुद्देत्रस्त कुलगुरूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र