शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

भेदभाव का करता? आम्हालाही  विकासासाठी निधी द्या; १७ सरपंचांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीची मागणी 

By गणेश हुड | Published: March 07, 2024 3:48 PM

मोजक्याच ग्रामपंचायतला मोठ्या प्रमाणात निधी वाटप करण्या  आला. यामुळे काही गावातील विकास कामांना ब्रेक लागले आहेत.

नागपूर : शासन निर्णयानुसार मोठ्या ग्रामपंचायतीना विकास कामाकरीता ५० लक्ष देण बंधनकारक आहे. असे असतानाही निधी वाटपात भेदभाव का करता? आम्हालाही शासन निर्णयानुसार गावांच्या विकासाठी निधी उपलब्ध करा, अशी मागणी १७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

जनसुविधा व नागरी सुविधांचा निधी मोठया ग्रामपंचायतींना उपलब्ध होणे अपक्षित आहे. जिल्हा स्तरावरून सन २०२३-०२४ या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नागरीसुविधा व जनसुविधा कामाचे प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानुसार ग्रामपंचायतीने नागरिकांच्या मागणीनुसार व गावाच्या विकासाकरीता प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करून ते मुदतीत पंचायत समितीकडे सादर केले आहेत. पंचायत समितीने प्रस्ताव जिल्हा परीषद  व जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले आहेत. परंतु जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये कामाला मंजुरी देताना भेदभाव करण्यात आला. मोजक्याच ग्रामपंचायतला मोठ्या प्रमाणात निधी वाटप करण्या  आला. यामुळे काही गावातील विकास कामांना ब्रेक लागले आहेत.

शासन निर्णयानुसार मोठ्या ग्रामपंचायतीना विकास कामाकरीता ५० लक्ष देण बंधनकारक आहे. असे असतानाही निधी वाटपात भेदभाव झाला असल्याने याची चौकशी करून प्रत्येक ग्रामपंचायत ला शासन निर्णयानुसार निधी वाटप करून भेदभाव दूर करून सर्व ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी सरपंच विष्णु कोकड्डे, दीपक सहारे, प्रवीण झाडे, मिनाक्षी तागडे, ज्योती खोडे, अशोक ढवरे, रोशनी ठाकरे, अन्नपूर्णा डहाके, होमेश्वर पानपते, कल्का काळे, अमोल केने, पवन धुर्वे, मधुकर दुगाने, जयश्री धुर्वे, संकेत झाडे, प्रिती मडावी, रामकली उरमाले यांच्यासह जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायत सरपंचांनी केली आहे.