शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

अजित पवारांबाबत शासन मूग गिळून गप्प का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 6:26 PM

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेवर असताना स्वत:च्या अधिकारांचा गैरवापर करून बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला चार सिंचन प्रकल्पांचे कंत्राट अवैधपणे मिळवून दिले. त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला, असा आरोप आहे. या प्रकरणात राज्य शासनाने अजित पवार यांच्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गेल्या दोन वर्षांपासून भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त करून पवार यांच्याबाबत शासन मूग गिळून का गप्प आहे, असा सवाल उपस्थित केला.

ठळक मुद्देहायकोर्टाची नाराजी : सिंचन प्रकल्पांमध्ये बाजोरिया कन्स्ट्रक्शनला मलाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेवर असताना स्वत:च्या अधिकारांचा गैरवापर करून बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला चार सिंचन प्रकल्पांचे कंत्राट अवैधपणे मिळवून दिले. त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला, असा आरोप आहे. या प्रकरणात राज्य शासनाने अजित पवार यांच्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गेल्या दोन वर्षांपासून भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त करून पवार यांच्याबाबत शासन मूग गिळून का गप्प आहे, असा सवाल उपस्थित केला.बाजोरिया कन्स्ट्रक्शनला वाटप झालेल्या अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्प, चांदूर रेल्वे तालुकास्थित रायगड नदी सिंचन प्रकल्प, दर्यापूर तालुकास्थित वाघाडी सिंचन प्रकल्प व बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भात कंत्राटदार अतुल जगताप यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. बाजोरिया कन्स्ट्रक्शनने राजकीय संबंधाचा उपयोग करून व बोगस कागदपत्रांच्या आधारे या सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळविल्याचा आरोप याचिकांत करण्यात आला आहे. माजी आमदार संदीप बाजोरिया हे कंपनीचे संचालक असून, त्यांचे अजित पवार यांच्यासोबत जवळचे संबंध असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने शासनाला अजित पवार यांच्याबाबत काय भूमिका आहे, अशी विचारणा केली. त्यावर सरकारी वकिलाकडे उत्तर नव्हते. परिणामी, न्यायालयाने शासनाची कानउघाडणी केली. चारही प्रकल्पांविषयीच्या आरोपांवर उत्तर सादर करताना शासनाने पवार यांच्याबाबत काहीच लिहिले नाही. ते पवार यांच्यावरील आरोपांबाबत सहमत आहेत की नाही हेदेखील स्पष्ट केले नाही, अशा शब्दांत न्यायालयाने शासनाला फटकारले.सर्व रेकॉर्ड सादर करण्याचा आदेशसुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. श्रीधर पुरोहित यांनी अजित पवार, बाजोरिया कन्स्ट्रक्शन व शासनावरील आरोपांचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. या प्रकरणात शासन प्रामाणिकपणे वागत नसल्याचे व चारही कंत्राटांची सखोल चौकशी होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या आरोपांचे शासनाकडे उत्तर नव्हते. परिणामी, न्यायालयाने चारही सिंचन प्रकल्पांसंदर्भातील रेकॉर्ड उद्या, गुरुवारी सादर करण्याचा आदेश विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला देऊन सुनावणी तहकूब केली.अजित पवारांना दिलासा नाहीचप्रकरणातील प्रतिवादींमधून स्वत:ला वगळण्यासाठी अजित पवार यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पवार यांच्यावर कोणतेही थेट आरोप नाहीत. राजकीय वैमनस्यातून त्यांना गोवण्यात आले आहे, असा दावा अर्जात करण्यात आलाय. पवार यांचे वकील अ‍ॅड. श्याम देवानी यांनी हा अर्ज मंजूर करण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, त्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.याचिकाकर्त्याच्या मागण्याबाजोरिया कंपनीला मिळालेल्या कंत्राटांची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, कंपनीला दिलेली कंत्राटे रद्द करून संबंधित कामासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, संबंधित प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा याचिकाकर्त्याच्या मागण्या आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAjit Pawarअजित पवार