शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

आमच्या भविष्यासोबतच खेळ का?विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 9:48 PM

कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अगोदरच कोरोनामुळे परीक्षांना बराच उशीर झाला आहे. अशा स्थितीत आता आंदोलनामुळे परीक्षांवर परत संकट आल्यामुळे विद्यार्थ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अगोदरच कोरोनामुळे परीक्षांना बराच उशीर झाला आहे. अशा स्थितीत आता आंदोलनामुळे परीक्षांवर परत संकट आल्यामुळे विद्यार्थ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकारणातून तर हा प्रकार होत नाही ना, असा सवालदेखील व्यक्त करण्यात येत असून काही प्राधिकरण सदस्यांनी राज्य शासनाच्या भूमिकेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना १ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विद्यापीठाने मोबाईलवरून परीक्षा देण्यासाठी विशेष अ‍ॅपदेखील विकसित केले होते. या अ‍ॅपमुळेदेखील विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात संभ्रम जाणवत होता. मात्र तो दूर होत असतानाच विद्यार्थ्यांना मंगळवारी मोठा धक्का बसला. यासंदर्भात अनेकांना बुधवारी माहिती कळाली व बहुतांश जणांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावरदेखील विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.सरकार विद्यार्थी हिताचा विचार कधी करणार?विद्यापीठातील काही प्राधिकरण सदस्यांनीदेखील या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. राज्य शासनाच्या अपरिपक्व धोरणाचा परत एकदा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. सरकार विद्यार्थी हिताचा विचार कधी करणार, असा प्रश्न व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी उपस्थित केला आहे.अधिकाऱ्यांच्या नजरा मुंबईकडेकाही आजी-माजी प्राधिकरण सदस्यांनी विद्यापीठाची परीक्षेची तयारी पूर्ण नव्हती व म्हणून परीक्षा पोस्टपोन करण्यात आल्याचा आरोप केला आहे. आमची परीक्षा घेण्याची पूर्ण तयारी असून प्रश्नसंचदेखील तयार आहेत. मोबाईल अ‍ॅपवरदेखील काहीच समस्या येणार नाहीत. आमच्या नजरा मुंबईकडेच लागल्या असून आंदोलन मिटल्यावर नवीन वेळापत्रक जारी करू, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थीexamपरीक्षा