लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरला स्मार्ट सिटी बनविण्याचा पहिला टप्पा पूर्व नागपुरातून सुरू होत आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात ज्यांचे घर रस्ते बनविण्यासाठी तोडण्यात येणार आहे, त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीसच्या विरोधात पूर्व नागपुरातील नागरिकांनी शुक्रवारी निदर्शने केली. गरिबांचे घर तोडून स्मार्ट सिटीचे निर्माण होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.स्मार्ट सिटी पीडित नागरिक मंचच्या नेतृत्वात शुक्रवारी जुना पारडी नाका चौकात काळे झेंडे दाखवित स्मार्ट सिटीला विरोध करण्यात आला. मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीचा आराखडा रद्द करून एनआयटीच्या विकास आराखड्यानुसार स्मार्ट सिटी विकसित करण्यात यावी. सोबतच स्मार्ट सिटीसाठी त्याच जागेचा उपयोग करण्यात यावा, जिथे ले-आऊट पडलेले नाही. शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाचा पाच पटीने मोबदला द्यावा. शिवसेनेच्या गुड्डू रहांगडाले यांचे म्हणणे आहे की, पारडी, पुनापूर, भरतवाडा व भांडेवाडी मध्ये प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने नियोजन केले आहे. सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात येईल. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास स्मार्ट सिटीचे काम होऊ देणार नाही.यावेळी काँग्रेस नेते उमाशंकर अग्निहोत्री, राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठे, अपक्ष नगरसेविका आभा पांडे, अरविंदसिंह राजपूत, रवनीश पांडे, रवी मस्के, अच्छन भाईजान, बबलू शेख, हरी बानाईत, सुमित कपाटे, दुर्गा शिववंशी, ललिता साहू, भोला वाठ, संजय राऊत, धीरज मारवंडे, कन्हैय्या जैन, अरविंद चौकसे, कृष्णा ठाकरे, किशन बघेल, सुनील कोल्हे, दर्शन करीया, संजय कारोंडे, दिनेश मेश्राम, नरेंद्र बघेल आदी उपस्थित होते.
गरिबांचे घर तोडून स्मार्ट सिटी कशासाठी ? पूर्व नागपुरात काळे झेंडे दाखवित निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 11:10 PM
नागपूरला स्मार्ट सिटी बनविण्याचा पहिला टप्पा पूर्व नागपुरातून सुरू होत आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात ज्यांचे घर रस्ते बनविण्यासाठी तोडण्यात येणार आहे, त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीसच्या विरोधात पूर्व नागपुरातील नागरिकांनी शुक्रवारी निदर्शने केली. गरिबांचे घर तोडून स्मार्ट सिटीचे निर्माण होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
ठळक मुद्देस्मार्ट सिटी पीडित नागरिक मंचचा सवाल