शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

भारतीयांच्या संशोधनाला अभ्यास पुस्तिकेत स्थान का नाही? पद्मभूषण शशिकुमार चित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 9:51 PM

डॉ. सी.व्ही. रमण, मेघनाद शहा, डॉ. बोस यांच्या संशोधनाला अभ्यासाच्या पुस्तकात स्थान मिळाले, कारण ते जागतिक दर्जाचे होते. त्यानंतर मात्र आपल्या देशातील संशोधक हे स्थान प्राप्त करू शकले नाही. वास्तविक आपल्याकडचे बहुतेक संशोधन पाश्चात्त्यांच्या प्रभावावर आधारीत व पेपर सादरीकरणापुरते मर्यादित असते. त्यामुळे नव्या संशोधकांनी अभ्यास पुस्तिकेत स्थान मिळेल, असे स्वत:चे काहीतरी निर्माण करावे, असे आवाहन ख्यातिप्राप्त गणिततज्ज्ञ व खगोलशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. शशिकुमार चित्रे यांनी केले.

ठळक मुद्देइन्स्टिट्यूट ऑफ सॉयन्समध्ये राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेला आरंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. सी.व्ही. रमण, मेघनाद शहा, डॉ. बोस यांच्या संशोधनाला अभ्यासाच्या पुस्तकात स्थान मिळाले, कारण ते जागतिक दर्जाचे होते. त्यानंतर मात्र आपल्या देशातील संशोधक हे स्थान प्राप्त करू शकले नाही. वास्तविक आपल्याकडचे बहुतेक संशोधन पाश्चात्त्यांच्या प्रभावावर आधारीत व पेपर सादरीकरणापुरते मर्यादित असते. त्यामुळे नव्या संशोधकांनी अभ्यास पुस्तिकेत स्थान मिळेल, असे स्वत:चे काहीतरी निर्माण करावे, असे आवाहन ख्यातिप्राप्त गणिततज्ज्ञ व खगोलशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. शशिकुमार चित्रे यांनी केले.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स यांच्यावतीने ‘इमर्जिंग ट्रेन्ड्स इन फंडामेंटल सायन्स’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. चित्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरी सायन्स विद्यापीठ (माफसू)चे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. आर.जी. आत्राम, फॉरेन्सिक सायन्सचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे, आयोजन समितीचे समन्वयक विद्यार्थी प्रतिनिधी मोहित माहुरकर, प्राची कठाणे व फ्रॅँ क बॉर्टन व्यासपीठावर उपस्थित होते.डॉ. शशिकुमार चित्रे यांनी ‘अ‍ॅस्ट्रोफिजिक्स अ‍ॅन्ड सोसायटी’ या विषयावर आपले विचार मांडले. अंतराळाबद्दल लोकांमध्ये सुरुवातीपासून कुतूहल राहिले आहे. मात्र ते उघड्या डोळ्याने दिसते त्यापुरते मर्यादित होते. गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावल्यानंतर अंतराळ संशोधनामध्ये क्रांतिकारक परिवर्तन निर्माण झाले. पुढे केपलरचे गणित सूत्र, न्यूटनचे गुरुत्वाकर्षण आणि आईनस्टाईन यांच्या सापेक्षतावादावरील सूत्रामुळे या क्षेत्रातील संशोधनाने प्रचंड वेग घेतला. १९५० नंतरचा काळ अंतराळ संशोधनाचा सुवर्णकाळ म्हणून मानला जातो. सॅटेलाईट, टीव्ही, आजचा मोबाईल आणि असंख्य प्रकारचे रासायनिक एलिमेंट हे खगोलशास्त्रातील संशोधनामुळेच शक्य झाल्याचे डॉ. चित्रे यांनी स्पष्ट केले. अंतराळ म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्राचा बेसिक अभ्यास करण्याची निसर्गाने निर्माण केलेली प्रयोगशाळाच होय, असे मत त्यांनी मांडले. चंद्र, सूर्याच्या सतत बदलणाऱ्या परिक्रमा, वातावरणातील बदल, आकाशगंगेतील ताऱ्यांचा पुंजका, हे सर्व संशोधनाचे विषय आहेत. या संशोधनातून नव्या ग्रहांची ओळख झाली. पूर्वी संशोधनासाठी हबल टेलिस्कोप ही एकच खिडकी होती. मात्र आज मानवाने चंद्र आणि मंगळावरही डिजिटल टेलिस्कोप लावला आहे.एक्स-रे, गॅमा रेज या नव्या संशोधनाच्या खिडक्या उपलब्ध झाल्या आहेत. या खिडक्यातून आणखी संशोधन होईल तेव्हा आपणही आश्चर्य करू, अशी भावना त्यांनी मांडली. माफसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर व डॉ. सुरेंद्र गोळे यांनी ‘अप्लिकेशन ऑफ ऑपरेशन रिसर्च इन रियल लाईफ’ विषयावर संशोधनात्मक विचार मांडले. विज्ञान संस्थेच्या प्राध्यापिका डॉ. सुजाता देव यांच्या संयोजनातून या विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.आपला सूर्य नष्ट होईल काय?खगोलशास्त्रात अनेक महत्त्वपूर्ण संशोधन झाले असले तरी आपण केवळ तळाशीच पोहचलो आहोत. सूर्य हा ४.५ कोटी वर्षापूर्वी निर्माण झाल्याचे मानले जाते व तो त्याचे अर्धे आयुष्य जगल्याचे बोलले जाते. म्हणजे एवढ्याच वर्षांनी तो नष्ट होणार, हा कुतूहलाचा विषय नाही काय, असा सवाल त्यांनी केला. आतापर्यंत जे संशोधन झाले ते केवळ ५ टक्के आहे. मात्र अंतराळात ९५ टक्के डार्क मटेरियल असू त्यापर्यंत अद्याप आपण पोहचलोच नाही. अनेक सूर्य, आकाशगंगा व आपल्यासारखी सजीवसृष्टी असलेली पृथ्वी अंतराळात असेल, ते संशोधन बाकी आहे. सोलर न्यूट्रिनो पझल, पॅराडॉक्स, ऑपरेशन ऑफ सोलर डायनॅमो, एक्स-रे बायनरी, प्रोटो स्टार्स, ब्लॅक होल अशा कितीतरी नव्या शाखा संशोधनासाठी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन डॉ. चित्रे यांनी केले.परिषदेत ४०० विद्यार्थ्यांचा सहभागडॉ. सुजाता देव यांनी सांगितले की, ही विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली परिषद आहे. यात देशभरातील नामांकित संस्थांच्या ४०० विद्यार्थी प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी स्वत: संशोधित केलेले पेपर सादर केले. यामध्ये भौतिकशास्त्र व गणितासह सांख्यिकी शास्त्र, रसायनशास्त्र, मेडिसिनल केमिस्ट्री, क्वॉन्टम मेकॅनिक्स, इन्स्ट्रुमेंटल टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान, वनस्पती व प्राणी हे सजीवशास्त्र, फॉरेन्सिक सायन्स, सोलर एनर्जी आदी विषयाचे संशोधन असून त्या प्रत्येक विषयाच्या सादरीकरणासाठी संस्थेत स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक विषयाचे पोस्टर प्रेझेंटेशनही विद्यार्थ्यांनी केले असून परीक्षकांच्या अवलोकनानंतर यातील विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहेत.सायन्स एक्सप्लोरेटरीचे विज्ञान मॉडेल्सयावेळी राजेंद्रसिंह सायन्स एक्सप्लोरेटरीच्यावतीने विज्ञान मॉडेल्सचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. मानवी शरीराची रचना, भौतिकशास्त्र, गणित व रसायनशास्त्राशी संबंधित मॉडेल्सचा समावेश आहे.