लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : उपचार व्यवस्था ताेकडी पडत असल्याने काही काेराेना संक्रमितांना डाॅक्टरांनी घरीच १४ दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला देऊन त्यांच्यावर औषधाेपचार सुरू केला. मात्र, यातील काही संक्रमित बिनधास्त बाहेर फिरत असून, ते कुटुंबीयांसह इतरांच्या संपर्कात येत आहेत. त्यांचा हा मुक्तसंचार संक्रमण वाढीस कारणीभूत ठरत असल्याने त्यांच्यावर अंकुश लावणे गरजेचे आहे. मात्र ही कामे करणार काेण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रत्येक पाॅझिटिव्ह रुग्णाला काेविड केअर सेंटरमध्ये ठेवणे शक्य नाही. त्यामुळे ज्यांचे इन्फेक्शन कमी प्रमाणत आहे, त्यांना डाॅक्टरांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला असून, औषधेही दिली आहेत. यातील काही रुग्ण नियमित औषधे घेत नसून, ते त्यांच्या कुटुंबीयांसह इतरांच्या संपर्कात येत आहेत. शिवाय, छाेट्या छाेट्या कामासाठी घराबाहेर पडताना दिसून येत आहेत.
काही रुग्ण चार-पाच दिवस विलगीकरणात राहून घराबाहेर पडले आहेत तर काही रुग्ण सुरुवातीपासून मनसाेक्त फिरत आहेत. सध्या गावात व शहरात काेण पाॅझिटिव्ह आहे आणि काेण निगेटिव्ह हे कळायला मार्ग नसल्याने तसेच काेराेना संक्रमितांचा वावर वाढल्याने दुसऱ्या टप्प्यात काेराेचे संक्रमण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. शिवाय, गृहविलगीकरणातील रुग्णांकडे कुणीही लक्ष देत नाही किंवा त्यांची साधी विचारपूसही केली जात नाही. ताेकड्या यंत्रणेमुळे प्रशासनाला ते शक्यही नाही. त्यातच नागरिक प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करायला तयार नसल्याने त्यांचाच बेजबाबदारपणा त्यांच्याच अंगलट येत असल्याचेही दिसून येत नाही.
...
घर सील करणे बरे हाेते
पहिल्या टप्प्यात रुग्णाच्या हातावर स्टॅम्प मारला जायचा शिवाय त्यांच्या घरावर फलक लावला जायचा. प्रसंगी त्यांच्या घराचा परिसर सील केला जायचा. त्यामुळे शेजाऱ्यांसह इतरांना रुग्णाबाबत माहिती हाेत असल्याने इतर नागरिक रुग्णांपासून दूर राहायचे. प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीपाेटी रुग्णही घराबाहेर पडणे टाळायचे. या उपाययाेजनेमुळे संक्रमण कमी हाेण्यास बरीच मदत झाली हाेती. दुसऱ्या टप्प्यात या उपाययाेजना केल्या जात नसल्याने रुग्णांवर कुणाचाही वचक राहिला नाही.
...
गृहविलगीकरणात असलेले रुग्ण मनसाेक्त फिरत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे फिरणे इतरांसाठी धाेकादायक ठरत असल्याने बाहेेर फिरणाऱ्या काेराेना संक्रमित रुग्णांवर कारवाई केली जाईल. तसे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
- प्रशांत सांगडे,
तहसीलदार, माैदा.