लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाच्या सत्ता काळात शहर कचरामुक्त करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. २००८ मध्ये याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. घरोघरी जाऊन कचरा संकलित करून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये वाहून नेण्याचा कंत्राट कनक रिसोर्सेस कंपनीला देण्यात आला. परंतु सत्ताधाऱ्यांच्या कृपादृष्टीमुळे सुरुवातीच्या काही वर्षात कनक व्यवस्थापनाची मनमानी सुरू होती. नंतर नगरसेवकांचा विरोध वाढल्याने व प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने कनक रिसोर्सेसच्या कामात काही प्रमाणात सुधारणा झाली. परंतु त्यानंतरही अपेक्षित सुधारणा झालेली नव्हती.शहराच्या मध्यवर्ती भागासोबतच शहरालगतच्या भागातील वस्त्यांत घरोघरी जाऊन कचरा संकलनाची जबाबदारी कनक रिसोर्सेसची आहे. तर रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व बाजार भागातील स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची आहे. शहरातील कचरा गोळा करून ठरलेल्या ठिकाणी संकलित करावयाचा आहे. तसेच घराघरातून जमा केलेला कचरा भांडेवाडी येथे पोहचवण्याची जबाबदारी कनकच्या कचरागाड्यांची आहे. कनककडे कचरा संकलन करणारी २०० वाहने आहेत. परंतु कचरागाड्यांवरील कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. गाडीवरील कर्मचारी आपल्या हाताने कचरा गाडीत टाकत नाही. घरात डस्टबीनमध्ये संकलित केलेला कचरा महिलांनाच आपल्या हाताने कचरा गाडीत टाकावा लागतो. ओला आणि कोरडा कचरा वगेवेगळा संकलित करावयाचा आहे. परंतु या सूचनांचे पालन केले जात नाही. यामुळे प्रक्रिया व्यवस्थित होत नाही.कचरा नियमित उचलला जात नाहीशहराच्या पूर्व, उत्तर व दक्षिण भागात तसेच शहरालगतच्या वस्त्यातून दररोज कचरा संकलित केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना उघड्यावर कचरा टाकावा लागतो. काही वस्त्यात दिवसाआड, काही ठिकाणी आठवड्यातून दोनदा तर काही भागात आठवड्यातून एकदाच कचरा उचलला जातो. त्यामुळे शहराच्या काही भागात कचरा तसाच पडून असतो. परिणामी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.खासगी मलबा उचलण्याची सूचनाअनेकदा कनक रिसोर्सेसच्या कर्मचाऱ्यांना खासगी बांधकामाचा मलबा उचलण्याच्या सूचना नगरसेवक करतात. यात माती व दगडांचा समावेश असल्याने या कचऱ्यावर प्रक्रिया करता येत नाही. तसेच वजनामुळे कनकच्या बिलात मोठ्या प्रमाणात वाढ होते. महापालिकेवर आर्थिक बोजा पडतो. सभागृहात नगरसेवकांनी अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला. परंतु पदाधिकारी व प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही.
कनक रिसोर्सेस कंपनीवर कृपादृष्टी कशासाठी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 9:39 PM
भाजपाच्या सत्ता काळात शहर कचरामुक्त करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. २००८ मध्ये याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. घरोघरी जाऊन कचरा संकलित करून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये वाहून नेण्याचा कंत्राट कनक रिसोर्सेस कंपनीला देण्यात आला. परंतु सत्ताधाऱ्यांच्या कृपादृष्टीमुळे सुरुवातीच्या काही वर्षात कनक व्यवस्थापनाची मनमानी सुरू होती. नंतर नगरसेवकांचा विरोध वाढल्याने व प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने कनक रिसोर्सेसच्या कामात काही प्रमाणात सुधारणा झाली. परंतु त्यानंतरही अपेक्षित सुधारणा झालेली नव्हती.
ठळक मुद्देवारंवार तक्रारी असूनही कारवाई नाही : सभागृहात ठोस निर्णय घेण्याची गरज