शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

नागपुरात मेट्रोने केले रस्ता रुंदीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:56 PM

शहरात निमार्णाधीन मेट्रो प्रकल्पांतर्गत लोकमान्यनगर ते सीताबर्डी मेट्रो स्टेशनदरम्यान रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे आधीच्या तुलनेत रस्त्यांची रुंदी वाढाल्याने वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्देमनपाला रस्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात निमार्णाधीन मेट्रो प्रकल्पांतर्गत लोकमान्यनगर ते सीताबर्डी मेट्रो स्टेशनदरम्यान रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे आधीच्या तुलनेत रस्त्यांची रुंदी वाढाल्याने वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे.प्रकल्पाच्या कामादरम्यान या भागात उभारलेले बॅरिकेडस् काढले आहे. रुंदीकरण आणि डांबरीकरणामुळे रस्त्यावर वाहन चालवणे आता सोयीचे झाले आहे. मार्गावर धावणाऱ्या वाहनांची गती वाढली आहे. वाहनचालकांनी वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन महामेट्रोने केले आहे.लोकमान्यनगर ते सीताबर्डीदरम्यान व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले असून रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम ७५ टक्के झाले आहे. या मार्गावर अभियांत्रिकी, वैद्यकीय, पॉलिटेक्निक तसेच इतर महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यांनी वेगावर नियंत्रण ठेवत अपघात टाळावे, असे आवाहन मेट्रोने केले आहे. सोबतच दुभाजकाचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार आहे.हा रस्ता महापालिकेला हस्तांतर करण्यासंबंधी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंबंधीचे पत्र महामेट्रोने दिले आहे. तसेच शहर पोलीस, वाहतूक पोलीस आणि नागपूर ग्रामीणमधील संबंधित विभागांना याची माहिती दिली आहे. लोकमान्यनगर ते सीताबर्डीदरम्यान अंबाझरी, शंकरनगर, एलएडी कॉलेज भाग वगळल्यास या मार्गावरील बहुतेक काम पूर्ण झाले आहे.सीताबर्डी ते लोकमान्यनगर दरम्यान असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या कार्यामध्ये व्हायाडक्टचे काम १०० टक्के तर मेट्रो स्थानकांचे काम ५२ टक्के झाले आहे. सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगरपर्यंत १०.०८ कि.मी. या मार्गावर एकूण ८ मेट्रो स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावर हिंगणा औद्योगिक वसाहत असून तेथील कर्मचाºयाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी येणाऱ्या काळात मेट्रो फायदेशीर ठरणार आहे.

 

टॅग्स :Metroमेट्रोNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका